'इंडिया आउट' मोहीमेला मालदीवमध्ये ब्रेक ! सरकारने केला कायदा

मालदीवच्या संसदेने 27 जून रोजी 'इंडिया आऊट' मोहिमेसह गुन्हेगारी स्वरुपाच्या कायद्यातील सुधारणांना मंजुरी दिली आहे.
Maldives
MaldivesDainik Gomantak
Published on
Updated on

मालदीवच्या संसदेने 27 जून रोजी 'इंडिया आऊट' मोहिमेसह गुन्हेगारी स्वरुपाच्या कायद्यातील सुधारणांना मंजुरी दिली आहे. सरकारने यासाठी कायदाही केला आहे. त्याचबरोबर, संसदेचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी 'इंडिया आउट' मोहिमेला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी चौकशीसाठी 214 समितीकडे 'इंडिया आउट' मोहिमेचा संदर्भ पाठवला होता. (Maldives Parliament Approves Amending Laws To Stop India Out Campaign)

दरम्यान, मालदीवचे (Maldives) अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह (President Ibrahim Mohamed Solih) यांनी अलीकडेच एक आदेश जारी करुन एजन्सींना इंडिया आऊट मोहीम थांबवण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच त्यांनी इंडिया आऊट मोहिमेला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचेही म्हटले होते.

Maldives
PM मोदींचे अबुधाबीत आगमन, UAE च्या अध्यक्षांनी केले स्वागत

भारताचा विरोध का सुरु आहे?

यामीन यांची प्रोग्रेसिव्ह पार्टी डिसेंबर 2022 पासून मालदीवमध्ये इंडिया आऊट मोहीम राबवत आहे. या मोहिमेचा उद्देश मालदीवमधून भारतीय सैनिकांना (Indian Soldiers) हटवणे हा असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. यामीन यांनी स्वत: असेही म्हटले आहे की, 'सत्ताधारी प्रशासनाने भारतीय लष्कराची उपस्थिती नाकारली असली तरी आम्ही ऑपरेशन सुरु ठेवणार आहोत.'

यामीन यांचा भारतविरोधी इतिहास आहे

यामीन 2013-18 दरम्यान मालदीवचे अध्यक्ष होते. त्या काळात भारत आणि मालदीवमधील संबंध खूपच बिघडले होते. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या लामू आणि अड्डू एटोलवरुन भारताला दोन हेलिकॉप्टर मागे घ्यावे लागले. दरम्यान, यामीन यांनी भारताला (India) विरोध करत चीनला मालदीवमध्ये येण्यासाठी मदत केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com