German Serial Killer Dainik Gomantak
ग्लोबल

German Serial Killer: क्रूरतेचा कळस! त्यानं 300 लोकांचं आयुष्य संपवल, नर्स म्हणून करायचा काम

हॉस्पिटलमध्येच त्याने 85 रूग्णांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

जर्मनीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जर्मनीतील एका सिरीयल किलरची (German Serial Killer) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या व्यक्तीवर एक, दोन नव्हे तब्बल 300 लोकांच्या हत्येचा आरोप आहे. सिरीयल किलरवर 85 प्रकरणांमध्ये गुन्हे सिद्ध देखील झाले आहेत. नील्स हॉगेल (वय 41) (Niels Högel's) असे या खतरनाक आरोपीचे नाव आहे. नील्स हॉगेल मेल नर्स (परिचारक) म्हणून काम करत असताना, हॉस्पिटलमध्येच त्याने 85 रूग्णांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नील्स हॉगेल या सिरीयल किलरने 300 लोकांची निर्घृण हत्या केली आहे. 15 वर्षात त्याने 300 लोकांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 2000 दशकाच्या सुरुवातीस त्याने उत्तर-पश्चिम जर्मनीतील एका रुग्णालयात काम करण्यास सुरुवात केली. नील्स होगेल जेव्हा शिफ्टमध्ये असतो तेव्हाच अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले.

नील्स होगेलच्या चौकशीचा भाग म्हणून रुग्णालय प्रशासनाने त्याला तीन आठवड्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले. नील्स रजेवर असताना, रुग्णालयात फक्त दोन रुग्णांचा मृत्यू झाला. सिरीयल किलर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना मारण्यासाठी औषधांचे प्राणघातक डोस देत होता. रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्याला असे करताना पकडले. 2005 मध्ये, पोलिस तपासात हॉस्पिटलमधील 73 टक्के मृत्यूंमागे निल्सचा हात असल्याचे दिसून आले.

जानेवारी 2018 मध्ये, नील्सवर 97 जणांच्या हत्येचे आरोप ठेवण्यात आले. खटल्याच्या पहिल्या दिवशी, होगेलने 43 खूनांची कबुली दिली. होगेलने इतर 52 खून आठवत नसल्याचे सांगण्यात आले. 6 जून 2019 रोजी होगेलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 85 खुनाच्या आरोपांत होगेलने दोषी आढळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

SCROLL FOR NEXT