Gay Relationship Singapore: सिंगापूर सरकारने रविवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने विवाहासंबंधी असणारा वसाहतकालीन कायदा रद्द केला आहे. सिंगापूरच्या वार्षिक राष्ट्रीय दिनाच्या रॅलीला संबोधित करताना, पंतप्रधान ली सिएन लूंग म्हणाले की, 'आमचा विश्वास आहे की, देशातील बहुतेक लोक आम्ही घेतला निर्णय स्वीकारतील. वसाहतकालीन कायदा रद्द करण्याची ही योग्य वेळ होती.'
जाणून घ्या काय म्हणाले पंतप्रधान
"हा कायदा सध्याच्या सामाजिक मॉडेलच्या अनुषंगाने आणण्यात आला आहे. मला आशा आहे की, यामुळे सिंगापूरमध्ये (Singapore) राहत असलेल्या समलैंगिकांना थोडासा दिलासा मिळेल," असे लूंग यांनी आपल्या भाषणात सांगितले.
समलैंगिक विवाहाला ग्रीन सिग्नल मिळेल
समलैंगिक विवाहाला (Marriage) परवानगी देताना कोणतेही घटनात्मक आव्हान निर्माण होणार नाही याची खात्री करण्यासाठी सरकार घटनेत दुरुस्ती करेल, असेही ते म्हणाले.
घटनादुरुस्ती करावी लागेल
लूंग पुढे म्हणाले, "कलम 377A रद्द करुनही, आम्ही विवाहसंस्थेचे समर्थन आणि संरक्षण करु." ते पुढे असेही म्हणाले, "त्यांच्या संरक्षणासाठी आम्हाला घटनेत दुरुस्ती करावी लागेल. आणि आम्ही तसे करु. कलम 377A रद्द करण्यात आम्हाला मदत करेल.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.