Sri Lanka Crisis: गोटाबाया राजपक्षेंना सोडावे लागले सिंगापूर, या देशात घेतला आश्रय

Gotabaya Rajapaksa: श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना कायदेशीर कारणांमुळे सिंगापूर सोडावे लागले आहे.
 Gotabaya Rajapaksa
Gotabaya RajapaksaDainik Gomantak
Published on
Updated on

Sri Lanka Crisis: श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना कायदेशीर कारणांमुळे सिंगापूर सोडावे लागले आहे. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, सिंगापूरच्या इमिग्रेशन अधिकार्‍यांनी गुरुवारी या वृत्ताला दुजोरा दिला. एका ठराविक कालावधीनंतर त्यांना देश सोडावा लागला.

 Gotabaya Rajapaksa
Sri Lanka Crisis: 30 लाख लोकांची भूक भागवण्यासाठी 500 कोटी रुपये आवश्यकता

रिपोर्ट्सनुसार ते थायलंडला (Thailand) गेले आहेत. अलीकडेच थायलंडने राजपक्षे यांच्या तात्पुरता मुक्कामासाठी सहमती दर्शवली आहे. थायलंडमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, राजपक्षे तिसऱ्या देशात स्वत:साठी कायमस्वरुपी आश्रय शोधण्याची शक्यता तपासतील.

जुलैमध्ये सिंगापूर सोडले

जुलैमध्ये श्रीलंकेतील सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान देश सोडल्यानंतर पूर्व राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांना सिंगापूरमध्ये आश्रय घ्यावा लागला. यातच त्यांच्या सिंगापूर व्हिसाची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे त्यांना सिंगापूर (Singapore) सोडून थायलंडमध्ये आश्रय घ्यावा लागला. ते 13 जुलै रोजी मालदीवमध्ये (Maldives) पोहोचले होते. त्यानंतर ते सिंगापूरला गेले, जिथे त्यांनी देशाच्या आर्थिक संकटाच्या निषेधार्थ राजीनामा जाहीर केला.

 Gotabaya Rajapaksa
Sri Lanka Crisis: दिनेश गुणवर्धना बनले श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

मानवतावादी आधारावर आश्रय मागितला

बँकॉक पोस्ट या वृत्तपत्राने प्रयुतच्या हवाल्याने लिहिले की, 'हा मानवतेचा मुद्दा आहे. राजपक्षे यांचा हा तात्पुरता मुक्काम आहे. त्यामुळे त्यांना कायमस्वरुपी आश्रयासाठी देश शोधावा लागणार आहे. वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्री डी प्रमुदविनाई यांनी सांगितले की, 'माजी राष्ट्रपती राजपक्षे यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट असल्याने ते 90 दिवस थायलंडमध्ये राहू शकतात.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com