(Gas cylinder Blast) रशियाच्या सखालिन बेटावर पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. 20 लिटरच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने सदर इमारतीचा भाग कोसळल्याची तपास समितीने माहिती दिलीय. या घटनेत कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झालाय. त्याचबरोबर एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती राज्यपालांनी दिलीय.
मॉस्कोच्या वेळेनुसार पहाटे 5:30 वाजता तेथील एका अपार्टमेंटमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर टिमोव्स्काया शहरातील पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर बचावपथक घटनास्थळी दाखल झालं असून ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या व्यक्तींचा शोध सुरु आहे. या शोध कार्यादरम्यान इमारतीत राहणाऱ्या ३३ लोकांपैकी काहींचा शोध लागत नसल्याचे बचावपथकाचे म्हणणे आहे. .
टास या वृत्तसंस्थेने आपत्कालीन सेवांमधील एका स्रोताचा हवाला देत म्हटले आहे की, 20 लिटरच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे अपार्टमेंटचा काही भाग कोसळला. रशियाच्या तपास समिती या घटनेची अधिक माहिती घेत असून या घटनेमागच्या कारणांचा शोध घेऊन उलगडा करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.