Plane-Truck Crash Viral Video: रनवेवर ट्रकला विमानाची भीषण धडक; पाहा पेरूतील थराराचा व्हिडिओ

102 प्रवाशांनी जीव मुठित घेऊन केला प्रवास; 20 प्रवासी जखमी
Plane-Truck Crash Viral Video
Plane-Truck Crash Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Plane-Truck Crash Viral Video: दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाची राजधानी लीमा येथील विमानतळावर रनवेवरच विमान आणि ट्रकची धडक झाली आहे. या विमानात 102 प्रवासी होते. यात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. विमानाचे आणि ट्रकचे मात्र नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Plane-Truck Crash Viral Video
Adnan Oktar: हजारो गर्लफ्रेंड असलेल्या धार्मिक नेत्याला 8000 वर्षांची शिक्षा

लीमा येथील जॉर्ज चावेज आंतरराष्ट्रीय विमानतळावर LATAM एअरलाईन्सचे विमान टेकऑफ करत असताना रणवेवर समोरून एक ट्रक येत होता. त्यावेळी विमानाने ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे विमानच्या पंखांनी पेट घेतला. पेट घेतलेले हे विमान तसेच पुढे गेले.

व्हिडिओत दिसते की, विमान आणि ट्रक यांच्यात खूप अंतर होते. पण विमान जवळ येताच ट्रक ड्रायव्हरने बचावाचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत धडक बसली होती. विमानाने थेट ट्रकला ओढतच नेले. त्यामुळे विमानाचा एक पंखा जमिनीवर घर्षण करत सरपटत राहिला. त्यामुळे त्याला आग लागली. ट्रकला धडकूनही काही अंतरापर्यंत विमान धावत राहिले. या विमानात 102 प्रवासी आणि 6 क्रु सदस्य होते. 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले दोघेही अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत. हे दोघेही त्या ट्रकमध्ये बसले होते. विशेष म्हणजे, हा फायर ट्रक रनवेवर कसा आला याची कुणालाच कल्पना नाही. विमानतळ प्रशासनाच्या मते, त्यांनी ही सेवा मागितली नव्हती.

Plane-Truck Crash Viral Video
Black Out In Ukraine: रशियाचा वीज केंद्रांवर हल्ला; युक्रेनमध्ये 1 कोटी नागरिक अंधारात

तत्काळ अधिकारी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कुणीही प्रवासी जखमी झालेला नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवली. तथापि, आगीमुळे येथे सर्वत्र काळ्या धुर दिसून येत होता. सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर काही काळासाठी विमानतळ बंद करण्यात आले होते. या अपघाताचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com