Russia News, Vladimir Putin news, Russia Ukraine War News  Dainik Gomantak
ग्लोबल

चेतावणी... G-7 च्या नेत्यांची पुतीन यांच्याविरोधात कठोर भूमिका

G-7 च्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकत्र भेटून रशियाला मोठा संदेश दिला आहे. युक्रेनमध्ये जे काही युद्ध गुन्हे घडले आहेत त्यासाठी सर्व दोषींना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध पुकारले असले तरी आता हे युद्ध कधी संपणार याचे उत्तर त्यांच्याकडेही नाहीये. जमिनीवरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होते आहे. रशियाही जगभर एकटा पडला आहे. आता G-7 च्या नेत्यांनीही पुतीन यांच्याविरोधात कठोर भूमिका स्वीकारल्याचे दिसून येते आहे. (The G-7 foreign ministers have met and sent a strong message to Russia)

G-7 च्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकत्र भेटून रशियाला (Russia) मोठा संदेश दिला आहे. युक्रेनमध्ये जे काही युद्ध गुन्हे घडले आहेत त्यासाठी सर्व दोषींना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. युक्रेनसोबतचे युद्ध केवळ रशियाने कोणतेही कारण नसताना चिथावणी देण्याच्या उद्देशाने सुरू केले होते, ज्यामुळे अनेक निष्पापांचा बळी गेला आहे आणि लाखो लोकांना स्वतःचा देश सोडावा लागला, यावरही जोर देण्यात आला आहे. (Russia Ukraine War News updates)

या बैठकीदरम्यान रशियाला तात्काळ आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावे, असा इशाराही दिला आहे, ज्यामध्ये युद्ध थांबवण्याचे देखील म्हटले आहे. याशिवाय रशियाने लवकरात लवकर युक्रेनमधून आपले सैन्य मागे घ्यावे, असेही म्हटले गेले आहे.

G-7 देशांकडून रशियावर आणखी कठोर निर्बंध लादले जातील आणि मोल्दोव्हासारख्या देशांना मदत दिली, यावरही जोर देण्यात आला. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या युक्रेनमधून स्थलांतरित झालेले अनेक नागरिक मोल्दोव्हात आश्रय घेत आहेत. अशा परिस्थितीत त्या छोट्या देशावर खूप दबाव आहे, म्हणूनच G-7 देश मोल्दोव्हाला मदत करण्याविषयीही बोलत आहेत.

तसे, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध अद्याप कमी झालेले नाहीये. 22 दिवस झाले, चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या, पण प्रत्यक्षात काहीच काम झालेले नाही. ना परस्परांच्या कोणत्याही प्रस्तावावरती विचार केला जात आहे आणि ना त्याबाबत सहमती दर्शवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

Amol Muzumdar: ‘..हा पुढचा सचिन तेंडुलकर'! पदार्पणात 260 धावांची खेळी, हिटमॅन रोहितला दिली संधी; विश्वचषकामागचा 'नायक'

Goa Politics: 'स्थलांतरित-समर्थक' सरकार दीड वर्षात पडणार, RGP स्थापन करणार पुढचे सरकार! मनोज परब यांचा मोठा दावा

SIR Campaign In Goa: गोव्यात 'एसआयआर' मोहिमेला सुरुवात, बूथ लेव्हल अधिकारी करणार डोर-टू-डोर सर्व्हे; डॉक्युमेंट तयार ठेवण्याचे मतदारांना आवाहन

गोव्यातील 'त्या' भीषण अपघातात अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ खेळाडुचा मृत्यू

SCROLL FOR NEXT