पुतीन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? 1,51,84,00,00,00,000 रुपयांची संपत्ती लपवण्यासाठी...

पुतीन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World’s Richest Man) म्हणून ओळखले जातात.
Vladimir Putin
Vladimir PutinDainik Gomantak

युक्रेनवरील (Ukraine) हल्ल्यानंतर अनेक देश रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचा तीव्र निषेध करत आहेत. पुतीन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World’s Richest Man) म्हणून ओळखले जातात. दरम्यान असे सांगितले जात आहे की, त्यांनी 200 अब्ज पौंडांची (1,51,84,00,00,00,000 रुपये) संपत्ती लपवली आहे. याव्यतिरिक्त, पुतीन (Vladimir Putin) यांची मुलगी विशेष सरे इस्टेटमध्ये अब्जाधीश रशियन भाडेकरु आहे. ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीने क्रेमलिनमधील एका शक्तिशाली व्यक्तीच्या मालमत्तेचा शोध सुरु केला आहे. (Vladimir Putin is known as the richest man in the world)

दरम्यान, रशियातील विरोधी पक्षाचे नेते अ‍ॅलेक्सी नॅव्हल्नी यांनी यापूर्वीच खुलासा केला आहे की, पुतिन यांनी सेंट पीटर्सबर्गचे महापौर, विद्यापीठातील मित्र आणि बालपणीचे मित्र, मुले, केजीबी हेर, सहयोगी यांच्या नेटवर्कमधून संपत्तीचा वापर करतात. आता नॅव्हल्नी कथित आरोपांखाली रशियन तुरुंगात आहेत. त्यांना 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Vladimir Putin
Russia-Ukraine War: स्लोव्हाकियाच्या संसदेने NATO च्या तैनातीला दिली मान्यता

डेली मेलच्या वृत्तानुसार, रशियन राष्ट्राध्यक्षांच्या जवळच्या मित्रांमध्ये त्यांच्या बालपणीच्या मित्राचाही समावेश आहे. ज्याची एकूण संपत्ती $500 दशलक्ष आहे. त्याच्या चुलत भावाच्या पुतण्याकडे देखील $500 दशलक्ष एवढी संपत्ती आहे. विशेष म्हणजे पुतीन यांचे माजी KGB बॉस जे आता रशियातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक प्रमुख आहेत. नॅशनल क्राईम एजन्सीच्या तथाकथित 'क्लेप्टोक्रेसी स्क्वाड' ने पुतीन यांच्या ब्रिटनमधील संपत्तीचा शोध सुरु केला आहे. कार्यकर्त्यांचा दावा आहे की, त्यांना तीन मुली आहेत, त्यापैकी एक त्यांच्या दुसर्‍या अफेयरमधून झालेली मुलगी आहे. तिची $100 दशलक्ष संपत्ती आहे. तर लीफी सरे इस्टेटमधील मालमत्तेची मालक आहे.

Vladimir Putin
Russia-Ukraine War : ICJ ने दिले रशियाला युक्रेनवरील आक्रमण थांबविण्याचे आदेश

पुतिन यांचा काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर अब्जावधी डॉलर्स किमतीचा महाल

नॅव्हल्नी यांनी दावा केला आहे की, 'पुतिन यांचा काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर एक अब्ज डॉलर्स किमतीचा विशाल महाल आहे. ज्यामध्ये $650 किमतीचा टॉयलेट ब्रश आहे. रशियाच्या सर्वात मोठ्या तेल आणि वायू कंपन्यांच्या शीर्षस्थानी असलेल्या प्रस्थापित असोसिएट्सकडून किकबॅकद्वारे वित्तपुरवठा केला जातो, परंतु जगभरातील विश्वासार्ह सहयोगींकडे त्यांनी मालमत्ता ठेवली आहे. व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या स्वरुपात लपविलेली मालमत्ता देखील त्यांच्याकडे असल्याचे देखील मानले जाते.'

तसेच, 68 वर्षीय पुतिन यांचा ल्युडमिला पुतीना यांच्याशी विवाह झाला. या लग्नापासून त्यांना 35 वर्षांची मारिया आणि 34 वर्षांची कटरिना या दोन मुली आहेत. 2013 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. क्लिनर स्वेतलाना क्रिव्होनोगिख यांच्याशी असलेल्या संबंधानंतर 2003 मध्ये लव्ह चाईल्ड एलिझावेताचा जन्म झाला होता. क्रिव्होनोगिख तिच्या मुलीसह मोनॅकोमध्ये राहतात, ज्यांनी त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर लगेचच $100 दशलक्ष एवढी संपत्ती कमावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com