टेस्लाचे मालक तसेच एरोस्पेस वाहतूक सेवा करणारी कंपनी स्पेसएक्सची स्थापना केली. अशा प्रकारे जगाचे लक्ष वेधून घेणारे एलन मस्क यांनी पुन्हा एकदा जगाच्या भविष्याबद्दल भाष्य केले आहे. मस्क यांनी म्हटलं आहे की, भविष्यातील जीवन हे मुख्यत: सौरऊजेवर अवलंबून असणार आहे. त्यांनी ट्विटरवरूल एका पोस्टला प्रतिक्रिया देत हे वक्तव्य केलं आहे. ( Future life will largely depend on solar energy - Elon Musk )
गेल्या काही दिवसात मस्क त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते. मस्क यांनी यूट्यूब ही एक नॉन स्टॉप स्कॅम जाहिरात असल्याचं म्हटलं होतं. ट्विटरची खरेदी केल्यापासून मस्क सतत चर्चेत आहेत. सध्या त्यांची ट्विटरसोबतची डील अडकली आहे. हे डील करताना आरंभी सक्रियता दाखवली होती. मात्र नतंर वेगवेगळे कारण देत त्यांनी ते थांबल्याचं स्पष्ट केले आहे.
वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंगने काय केलं ट्विट ?
वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंग या ट्विटर अकाऊंटने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये असं लिहिलं होतं की, जगाला सौरऊजा पुरवण्यासाठी सहारा वाळवंटाएवढं पृष्ठभागाचं क्षेत्र आवश्यक आहे. या अभ्यासानुसार, संपूर्ण जगाला ऊर्जा पुरवण्यासाठी सहारा वाळवंटाच्या पृष्ठभागाएवढं क्षेत्र आवश्यक असेल, असं म्हटलं आहे. या बद्दव बोलतााना मस्क यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'भविष्यात जीवन सौरऊर्जेवर जास्त अवलंबून असेल.'
एलन मस्क यांचा जन्म हा दक्षिण आफ्रिकेत झाला असून ते अमेरिकन औद्योगिक अभियंता, उद्योजक आहेत, ज्यांनी Paypal ची स्थापना केली आहे. आणि एरोस्पेस वाहतूक सेवा कंपनी SpaceX ची स्थापना केली. तसेच ते टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीमधील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत आणि आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.