Afghan Citizens Dainik Gomantak
ग्लोबल

भारत बनला अफगाणिस्तानसाठी ‘फरिश्ता’, अफगाण नागरिकांसाठी पाठवली जाणार मदत

परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, येत्या आठवड्यात आम्ही अफगाणिस्तानला (Afghanistan) मानवतावादी मदत पाठवत आहोत.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधील अशरफ घनी यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मोठ्याप्रमाणात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले. लाखो अफगाण नागरिकांवर देश सोडण्याची वेळ आली. याच पाश्वभूमीवर आता अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुरु असलेल्या संकटाच्या काळात भारत (India) देवदूत म्हणून पुढे आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, येत्या आठवड्यात आम्ही अफगाणिस्तानला मानवतावादी मदत पाठवत आहोत. यामध्ये प्रामुख्याने औषधे आणि खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे. भारताने आधीच अफगाणिस्तानला वैद्यकीय मदतीच्या 3 शिपमेंट्सचा पुरवठा केला आहे, ज्यात कोविड लसीचे 5,00,000 डोस आणि जीवन रक्षक औषधांचा समावेश आहे. (From India To Afghanistan Next Week Humanitarian Aid Will Be Sent)

परराष्ट्र मंत्रालयाने पुढे सांगितले की, भारताने अफगाणिस्तानला (India-Afghanistan Relations) 3 टन आवश्यक जीवनरक्षक औषधे असलेली वैद्यकीय मदतीची चौथी तुकडी देखील पुरवली आहे. ती मदत काबूलमधील (Kabul) इंदिरा गांधी रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. भारत अफगाणिस्तानला अनेक वर्षांपासून मदत करत आहे. युद्धग्रस्त देशात भारताने अनेक प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूकही केली आहे. तालिबानी राजवट आल्यापासून अफगाणिस्तानातील आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा वेळी भारताने त्याला मदतीचा हात पुढे केला आहे.

पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात गहू पाठवला जाईल

त्याचवेळी, भारताने पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवलेल्या गव्हाच्या मालाचा पुरवठा पुढील महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, भारत आणि पाकिस्तान (Pakistan) अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर अफगाणिस्तानला गहू पुरवण्याच्या मतावर सहमत झाले आहेत. देशासमोरील मानवतावादी संकटाचा सामना करण्यासाठी भारत अफगाणिस्तानला अखंडित मानवतावादी मदत पुरवण्यासाठी अग्रेसर आहे. 50,000 टन गहू आणि औषधे पाकिस्तानमार्गे रस्ते वाहतुकीने अफगाणिस्तानला पाठवण्याची घोषणा आधीच करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT