Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Venga: भूकंपापासून ते पुतिनच्या हत्येपर्यंत... बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी होणार का?

Baba Venga: बल्गेरियाची गूढ ज्योतिषी बाबा वेंगा यांचे 27 वर्षांपूर्वी निधन झाले, परंतु त्यांनी केलेली भाकित आज खरी ठरताना दिसत आहेत.

Manish Jadhav

Baba Venga: बल्गेरियाची गूढ ज्योतिषी बाबा वेंगा यांचे 27 वर्षांपूर्वी निधन झाले, परंतु त्यांनी केलेली भाकित आज खरी ठरताना दिसत आहेत. 2024 बद्दलचे त्यांचे अंदाज आज लोकांना आश्चर्यचकित करत आहेत.

त्यांनी ज्या प्रकारची गोष्ट सांगितल्या त्या आजा खऱ्या ठरताना दिसत आहेत. बाबा वेंगा अंध होत्या. असे म्हटले जाते की, त्यांचे अनेक अंदाज खरे ठरले आहेत. बाबा वेंगा या बल्गेरियाचे रहिवासी होत्या.

विशेष म्हणजे, त्यांना बाल्कनचा 'नॉस्ट्राडेमस' म्हणून ओळखले जाते. त्याने 9/11 चा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि ब्रेक्झिटचीसंबंधी भविष्यवाणी केली होती.

2024 बद्दल काय भाकीत केले

दरम्यान, बाबा वेंगा यांनी 2024 बद्दल अनेक भाकिते केली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या हत्येचा प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान पुतिन यांना केवळ परकीय शक्तींकडूनच नव्हे तर त्यांच्या देशातूनही विरोध होत आहे.

याशिवाय, बाबा वेंगा म्हणाल्या होत्या की, पृथ्वी आपली कक्षा बदलेल ज्यामुळे नैसर्गिक संकटे येतील. 2024 मध्ये कॅन्सरवर उपचार शोधण्यात मदत होईल, असेही त्या म्हणाल्या होत्या.

बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की, 2024 मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची त्यांच्याच देशातील कोणीतरी हत्या करेल. याशिवाय युरोपमध्ये अराजकता माजेल आणि दहशतवादी हल्ले होतील, असेही त्यांनी म्हटले होते.

विशेष म्हणजे, बाबा वेंगा यांनी आर्थिक संकटाबद्दलही भविष्यवाणी केली होती. अर्थव्यवस्थेचे (Economy) केंद्र पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकले जाऊ शकते, असे त्यांनी भाकित केले होते.

बाबा वेंगांच्या भाकितांमध्ये सायबर गुन्ह्याचाही उल्लेख होता. याशिवाय, जलशुद्धीकरण केंद्रावर मोठा हल्ला होणार असून त्यामुळे सुरक्षेचे आव्हान निर्माण होईल, असेही त्यांनी म्हटले होते.

औषध आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विकास होईल आणि कॅन्सरसारख्या आजारांवर उपचारही उपलब्ध होतील, असे त्यांनी भाकित केले होते. याशिवाय, क्वांटम कॉम्प्युटिंग क्षेत्रातही प्रगती होईल. बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT