PM Modi & Emmanuel Macron Dainik Gomantak
ग्लोबल

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, PM मोदींचे स्वीकारले निमंत्रण!

Republic Day: यापूर्वी, केंद्र सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, मात्र त्यांनी जानेवारीत दिल्लीत येण्यास असमर्थता व्यक्त केली होती.

Manish Jadhav

French President Macron Will Be India Guest On Republic Day: यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात (2024) फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे असतील. त्यांनी पंतप्रधान मोदींचे निमंत्रण स्वीकारले आहे. यापूर्वी, केंद्र सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, मात्र त्यांनी जानेवारीत दिल्लीत येण्यास असमर्थता दर्शवली होती. प्रजासत्ताक दिनी भारताला भेट देणारे मॅक्रॉन हे सहावे फ्रेंच नेते असतील. त्यांच्या आधी 1976 मध्ये फ्रान्सचे पंतप्रधान जॅक शिराक, 1980 मध्ये राष्ट्राध्यक्ष व्हॅलेरी गिसकार्ड डी'एस्टिंग, 1998 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक, 2008 मध्ये राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोझी, 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन 26 जानेवारीला भारत दौऱ्यावर येणार असल्याचे फ्रान्सच्या राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आले आहे. यावेळी ते नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पीएम मोदींनी यावर्षी जुलैमध्ये फ्रान्सला भेट दिली आणि पॅरिसमध्ये बॅस्टिल डे (फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस) च्या समारंभाला सन्माननीय पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना 2024 च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते. 'बॅस्टिल डे' 14 जुलै 1789 रोजी बॅस्टिल, एक लष्करी किल्ला आणि तुरुंगाच्या पतनाचे चिन्हांकित करतो, जेव्हा संतप्त जमावाने त्यावर हल्ला केला आणि तेथील कैद्यांची सुटका केली. फ्रेंच राज्यक्रांतीही येथूनच सुरु झाली असे मानले जाते.

दुसरीकडे, भारत दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जागतिक नेत्यांना आमंत्रित करतो. तथापि, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 2021 आणि 2022 मध्ये प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे नव्हते. या वर्षाच्या सुरुवातीला इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे होते. तर 2020 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्रपती जैर बोलसोनारो हे प्रमुख पाहुणे होते. 2019 मध्ये, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे प्रमुख पाहुणे होते, तर 2018 मध्ये, सर्व 10 ASEAN देशांचे नेते या समारंभाला उपस्थित होते.

तसेच, 2017 मध्ये अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान हे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते, तर 2016 मध्ये फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइस ओलांद हे या सोहळ्याला उपस्थित होते. 2014 मध्ये, दिवंगत तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते, तर भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक 2013 मध्ये परेडला उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणारे स्टेट आणि सरकार प्रमुखांमध्ये निकोलस सार्कोझी, व्लादिमीर पुतिन, नेल्सन मंडेला, जॉन मेजर, मोहम्मद खातामी आणि जॅक शिराक यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT