Jean Luc Godard  Dainik Gomantak
ग्लोबल

फ्रेंच सिनेमाचे गॉडफादर Jean Luc Godard यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन

French Filmmaker: फ्रान्स सिनेमाचे गॉडफादर आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक जीन-लूक गोडार्ड यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

French Filmmaker Jean Luc Godard Dies: फ्रान्स सिनेमाचे गॉडफादर आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक जीन-लूक गोडार्ड यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. लिबरेशन न्यूजपेपरने गोडार्ड यांच्या निकटवर्तीयांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. ते जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक होते, जे 'ब्रेथलेस' आणि 'कंटेम्प्ट' सारख्या क्लासिक्ससाठी ओळखले जात होते.

दरम्यान, साठच्या दशकात गोडार्ड यांनी फ्रेंच चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एक नवी क्रांती घडवून आणली होती. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वत:च्या शैलीत चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. गोडार्ड यांच्या अनेक चित्रपटांनी त्यांच्या आशय आणि कलाकुसरीच्या माध्यमातून फ्रेंच तसेच हॉलीवूड सिनेमांसमोर एक आदर्श ठेवला होता.

जागतिक पटलावर आपली छाप सोडली

साठच्या दशकात गोडार्ड यांची ओळख प्रसिद्ध 'न्यू वेव्ह सिने मूव्हमेंट'शी जोडली गेली होती. गोडार्ड यांच्या चित्रपटांनी मार्टिन स्कोर्सेस, बर्नार्डो बर्टोलुची आणि पियरे पाओलो पासोलिनी यांच्यासह त्यांच्या समकालीन आणि नंतरच्या पिढ्यांतील दिग्दर्शकांवर प्रभाव टाकला होता.

अशी सिनेमाची आवड निर्माण झाली होती

गोडार्ड यांचा जन्म 3 डिसेंबर 1930 रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे एका संपन्न कुटुंबात झाला होता. परंतु ते चार वर्षांचे असताना त्यांचे कुटुंबीय स्वित्झर्लंडला (Switzerland) स्थायिक झाले. ते सुरुवातीपासूनच सिनेप्रेमी नव्हते, परंतु लेखक माल्रो यांचा सिनेमावर प्रकाशित झालेला प्रबंध वाचल्यानंतर त्यांना सिनेमात गोडी निर्माण झाली होती. त्यांना तो प्रबंध इतका आवडला होता की, त्यांनी सिनेसृष्टीत क्रांती घडवून आणली.

तसेच, जीन-ल्यूक गोडार्ड (Jean Luc Godard) आपल्या समवयस्कांसह चित्रपट समीक्षक बनले होते. फ्रान्समधील (France) न्यू वेव्ह सिने चळवळीनंतर ते विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी स्वत: च्या शैलीत चित्रपट (Movie) बनवू लागले होते. त्यांचा पहिला चित्रपट "ब्रेथलेस" होता, ज्याने त्यांना निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT