फ्रान्सचे (France) माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी (Nicolas Sarkozy) यांना 2012 च्या निवडणुकीत अवैध पैसा (Illegal money) वापरल्याच्या कारणास्तव गुरुवारी दोषी धरण्यात आले  Dainik Gomantak
ग्लोबल

निडणुकीचा अवैध खर्च भोवला, फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांना कोर्टाचा दणका

सार्कोझीने (Nicolas Sarkozy) न्यायालयाला सांगितले की, अतिरिक्त पैशाचा वापर त्यांच्या प्रचारासाठी करण्यात आलेला नाही. उलट त्यातून इतर लोकांना मदत करण्यात आली आहे. यामागे आपला कोणलाही फसविण्याचा हेतू नव्हता.

दैनिक गोमन्तक

फ्रान्सचे (France) माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी (Nicolas Sarkozy) यांना 2012 च्या निवडणुकीत अवैध पैसा (Illegal money) वापरल्याच्या कारणास्तव गुरुवारी दोषी धरण्यात आले असून, त्यांना एका वर्षाची नजरकैद सुनावण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग ब्रेसलेट परिधान करून कोर्टा त्यांची शिक्षा पूर्ण करण्याची अनुमती देऊ शकते. सार्कोझी 2007 ते 2012 पर्यंत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते आणि आपण काहीही चुकीचे केलेले नसल्याचा त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. ते या निर्णयाविरोधात अपील करण्याची शक्यता आहे.

निकाल घोषित करताना सार्कोझी पॅरिस न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यांच्यावर निवडणुकीत 27.5 कोटी डॉलर जास्त खर्च केल्याचा आरोप आहे. ही रक्कम निवडणुकीत खर्च करण्याच्या रकमेपेक्षा दुप्पट आहे. त्यांचा समाजवादी नेते फ्रँकोइस ओलांद यांनी पराभव केला. कोर्टाने म्हटले की, सार्कोझींना चांगले माहित होते की पैसे खर्च करण्याची मर्यादा ओलांडली गेली आहे. पण यानंतरही त्यांनी अतिरिक्त खर्चाला लगाम घातला नाही. माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोझी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. मे आणि जूनमध्येही त्यांनी न्यायालयात आपण निर्दोष असल्याचे सांगितले होते.

लेखापालांनी पैशाची मर्यादा ओलांडण्याचा दिला होता इशारा

निवडणूक निधी प्रकरणाच्या संदर्भात, सरकारी वकिलांचे असे म्हणणे आहे, 2012 च्या निवडणुकीपूर्वी सार्कोझी यांना माहित होते की त्यांचा खर्च कायद्याची कमाल मर्यादा गाठत आहे. फ्रेंच कायद्यानुसार, निवडणुकांमध्ये पैसे काटेकोरपणे वापरावा लागतो. त्यांच्या अकाउंटंट्सनी त्यांना पैशाबद्दल चेतावणी दिली होती. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वकिलांनी असा युक्तिवाद केला की सार्कोझी हे एकमेव व्यक्ती आहेत, जे अवैध निधी वापरण्यास जबाबदार आहेत. त्यांनी मोठ्या रॅलींसह अनेक मोर्चे आयोजित करून पैशांची मर्यादा ओलांडली.

माजी राष्ट्रपतींनी आपल्या बचावामध्ये हे सांगितले

सुनावणी दरम्यान, सार्कोझीने न्यायालयाला सांगितले की, अतिरिक्त पैशाचा वापर त्यांच्या प्रचारासाठी करण्यात आलेला नाही. उलट त्यातून इतर लोकांना मदत करण्यात आली आहे. यामागे आपला कोणलाही फसविण्याचा हेतू नव्हता. माझे दैनंदिन वेळापत्रक मी सांभाळत नव्हतो त्यासाठी माझी एक टीम होती. त्यामुळे खर्चाच्या रकमेसाठी त्यांना फक्त त्यांना दोष देता येणार नाही. या प्रकरणात माजी राष्ट्रपतींशिवाय इतर 13 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे सदस्य, लेखापाल आणि रॅली आयोजक यांचा समावेश आहे. या सर्वांना बनावट प्रकरण, विश्वास तोडणे, फसवणूक करणे आणि बेकायदेशीर निधीसह अनेक आरोप लावण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT