Indian Origin Were Sentenced To 122 Years In Britain Dainik Gomantak
ग्लोबल

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या चार जणांना 122 वर्षांची शिक्षा; काय होता तो जघन्य गुन्हा?

Indian Origin: गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, पश्चिम ब्रिटनमधील श्रुसबरी येथे झालेल्या हल्ल्याबाबत स्थानिक वेस्ट मर्सिया पोलिसांना सतर्क करण्यात आले होते.

Manish Jadhav

Indian Origin Were Sentenced To 122 Years In Britain: एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी ब्रिटनच्या न्यायालयाने चार भारतीय वंशाच्या आरोपींना 122 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हे लोक भारतीय वंशाच्या 23 वर्षीय डिलिव्हरी ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी दोषी आढळले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, पश्चिम ब्रिटनमधील श्रुसबरी येथे झालेल्या हल्ल्याबाबत स्थानिक वेस्ट मर्सिया पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना घटनास्थळी ओरमान सिंग नावाचा व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला होता. त्यानंतर खुनाच्या संशयावरुन पोलिसांनी चौघांना अटक केली होती.

दरम्यान, अर्शदीप सिंग (24), जगदीप सिंग (23), शिवदीप सिंग (27) आणि मनजोत सिंग (24) यांना या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्यांना प्रत्येकाला जन्मठेपेची शिक्षा झाली (किमान 28 वर्षे तुरुंगात). 24 वर्षीय सुखमनदीप सिंग हा पाचवा भारतीय वंशाचा व्यक्तीही हत्येच्या कटात सामील असल्याचे समजते. तो ओरमनबद्दल माहिती पुरवल्याबद्दल दोषी आढळला आणि त्याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली.

खुनाच्या तपासाचे नेतृत्व करणारे वेस्ट मर्सिया पोलिसांचे डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर (डीसीआय) मार्क बेल्लामी म्हणाले: ''ओरमन सिंगच्या निर्घृण हत्येसाठी या लोकांना शिक्षा सुनावण्यात आल्याचा मला आनंद आहे. हे पाच जण आता तुरुंगात आपली शिक्षा भोगतील जिथे ते आणखी नुकसान करु शकणार नाही."

ओरमनच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांची शोकांतिका शब्दांत व्यक्त करता येणार नाही. पोलिसांद्वारे जारी केलेल्या निवेदनात कुटुंबाने म्हटले की, “आज आई तिच्या मुलाशिवाय वृद्ध होईल. एक बहीण तिच्या भावाशिवाय मोठी होईल. आमच्यासोबत जे घडलं ते इतर कोणत्याही कुटुंबाबाबत घडावं असं आम्हाला वाटत नाही. हे आमच्यासाठी असह्य होणारं दु:ख आहे. ”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT