Four Indians death in Nepal accident  Dainik Gomantak
ग्लोबल

नेपाळमध्ये अपघातात चार भारतीयांचा मृत्यू

दक्षिण नेपाळ मधील रौताहत जिल्ह्यात हा अपघात झाला.

दैनिक गोमन्तक

काठमांडू: नेपाळमधील (Nepal) रौताहत जिल्ह्यात काल रात्री एका तळ्यात मोटार कोसळून मोठा अपघात झाला या अपघातात 4 भारतीयांचा (Indians) समावेश आहे. आणि त्या चार भारतीयांचा या अपघातात (Accident) मृत्यू झाला. वाहनचालकासह मोटारीतील तिघांनी मद्यप्राशन केले होते आणि त्यामुळे मोटारीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दक्षिण नेपाळ मधील रौताहत जिल्ह्यात हा अपघात झाला. या अपघातात ठार झालेले सर्व जण बिहारचे रहिवासी असून त्यांची ओळख पोलिसांना पटली आहे. ज्या तळ्यात हि मोटार कोसळली ते तळे गौर-चंद्रपुर रस्त्यावर आहे. या ठिकाणाहून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ते वाहन तळ्यात जावून बुडाले. या अपघातात ठार झालेल्या 4 व्यक्तींकडे असलेल्या आधार कार्डामुळे त्यांची ओळख पटू शकली.

काल रात्री नेपाळ पोलिसांनी या बाबतची माहिती भारतीय पोलिसांना दिली आहे. त्यानुसार मृतांचे नातेवाईत नेपाळला पोहचले असून आज सकाळी त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT