former japanese pm Shinzo Abe Dainik Gomantak
ग्लोबल

Shinzo Abe Death: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

Former Japan PM Shinzo Abe: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर गोळीबार झाला असुन उपचार सुरू होते.

दैनिक गोमन्तक

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (PM Shinzo Abe) यांचे निधन झाले. त्याच्यावर जपानमधील नारा शहरात भाषण करतांना गोळ्या झाडण्यात आल्या आणि ते जमिनीवर कोसळले. जपानच्या एनएचके वर्ल्ड न्यूजनुसार, संशयित हल्लेखोराला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. (japanese former pm Shinzo Abe Passes away News)

हल्लेखोराने मागून हल्ला केला

दरम्यान, 67 वर्षीय शिंजो आबे यांच्यावर आज स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता हल्ला झाला. आबे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू होते. सभेदरम्यान गोळ्यांचा आवाज ऐकू आला आणि एका संशयिताला घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एनएचके वर्ल्ड न्यूजच्या पत्रकाराने सांगितले की, आबे यांच्या भाषणादरम्यान त्यांनी सलग दोन स्फोट ऐकले.

जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, शुक्रवारी नारा येथील रस्त्यावर भाषण देत असताना शिंजो आबे यांच्यावर एका व्यक्तीने मागून हल्ला केला. गोळी लागल्याने शिंजो आबे जमिनीवर पडताच त्यांचे सुरक्षा रक्षक लगेच त्यांच्याकडे आले. आबे यांच्या मानेतून खूप रक्त निघाल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमी झाल्यानंतर शिंजो आबे यांना एअर अॅम्ब्युलन्सने विमानाने हलवण्यात आलं होते. एनएचकेने पोलिस सूत्रांचा माहिती देत सांगितले की, हल्लेखोर 40 वर्षांचा असल्याचे दिसत आहे. एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये राजीनामा दिला होता. आबे यांनी 2006 मध्ये एक वर्ष आणि पुन्हा 2012 ते 2020 पर्यंत या पदावर काम केले.

शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहिले. आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये राजीनामा दिला होता. आबे यांनी 2006 मध्ये एक वर्ष आणि पुन्हा 2012 ते 2020 पर्यंत या पदावर काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT