India & China  Dainik Gomantak
ग्लोबल

'भारत आणि चीनने एकमेकांची ऊर्जा वाया घालवू नये'

भारत आणि चीनने (China) एकमेकांची ऊर्जा वाया घालवण्याऐवजी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकमेकांना मदत करावी, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

भारत आणि चीनने एकमेकांची ऊर्जा वाया घालवण्याऐवजी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकमेकांना मदत करावी, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे. सोमवारी वार्षिक पत्रकार परिषदेत यी यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, जून 2020 मध्ये LAC जवळील गलवान व्हॅलीवरील (Galwan Valley) संघर्षानंतर आशियातील या दोन देशांमधील संबंध बिघडले होते. गलवान खोऱ्यातील संघर्षादरम्यान दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आले होते. यावेळी भारताच्या 20 सैनिकांना प्राण गमवावा लागला होता. तर दुसरीकडे चार चिनी सैनिकांचा मृत्यू झाला होता. बीजिंगमध्ये (Beijing) पत्रकार परिषदेत वांग यांनी हे मान्य केले की, ''अलिकडच्या वर्षांत भारतासोबतच्या संबंधांना धक्का बसला आहे. काही शक्तींनी भारत (India) आणि चीनमध्ये (China) संघर्ष आणि फूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.'' (Foreign Minister Wang Yi has said that India and China should help each other achieve their goals)

20 महिन्यांपासून संघर्ष सुरू

पूर्व लडाखच्या सीमेवर 5 मे 2020 रोजी पॅंगॉन्ग लेक परिसरात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर तणाव निर्माण झाला होता. म्हणजे 20 महिन्यांपासून गलवानमध्ये (galwan-valley)भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू आहे. तेव्हापासून या भागात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात सैनिक आणि शस्त्रे तैनात करण्यात आली होती. लष्करी आणि राजनैतिक(political) पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर, दोन्ही बाजूंनी गेल्या वर्षी पॅंगॉन्ग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील किनारी भागातील आणि गोगरा परिसरातून माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT