चीनने संरक्षण बजेटमध्ये केली वाढ, भारताला मिळणार टक्कर?

चीनने (China) शनिवारी आपले संरक्षण बजेट 7.1 टक्क्यांनी वाढवून 230 अब्ज डॉलरवर नेण्याचा प्रस्ताव गतवर्षीच्या 209 अब्ज डॉलरवरुन मांडला आहे.
Xi Jinping
Xi JinpingDainik Gomantak
Published on
Updated on

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. याच पाश्वभूमीवर चीनने शनिवारी आपले संरक्षण बजेट 7.1 टक्क्यांनी वाढवून 230 अब्ज डॉलरवर नेण्याचा प्रस्ताव गतवर्षीच्या 209 अब्ज डॉलरवरुन मांडला आहे. त्यामुळे आता चीनचे (China) संरक्षण बजेट भारताच्या तिप्पट होणार आहे. (China has increased its defence budget to 230 billion)

पंतप्रधान ली केकियांग यांनी शनिवारी चीनच्या संसदेत नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) समोर सादर केलेल्या मसुद्याच्या बजेटनुसार, चीन सरकारने 2022 या आर्थिक वर्षासाठी 1,450 अब्ज युआनचे संरक्षण बजेट प्रस्तावित केले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.1 टक्क्यांनी जास्त आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनकडून ताकद दाखवण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Xi Jinping
Russia-Ukraine War: रशिया अन् अमेरिका आता आमनेसामने

दरम्यान, चीनच्या पंतप्रधानांनी संसदेत सादर केलेल्या अहवालात म्हटले की, 'पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ची युद्धसज्जता मोठ्या प्रमाणावर मजबूत करण्यावर' भर दिला आहे. ते यावेळी म्हणाले, 'पीएलएने देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरंक्षण बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.'

Xi Jinping
Russia-Ukraine War: आता रशिया करणार 'या' शस्त्राद्वारे जमिनीवर हल्ला

तसेच, संरक्षण बजेट व्यतिरिक्त, चीनचे अंतर्गत सुरक्षा बजेट वेगळे आहे. जे अनेकदा संरक्षण खर्चापेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी चीनचे संरक्षण बजेट $ 200 अब्ज होते. चीनने आर्थिक वर्ष 2021 मध्ये आपल्या संरक्षण बजेटमध्ये 6.8 टक्क्यांनी वाढ करुन करुन एकूण संरक्षण बजेट 209 अब्ज डॉलरवर नेले होते. 2012 मध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) सत्तेवर आल्यापासून संरक्षण खर्चात वाढ झाली आहे. संरक्षण बजेटवरील खर्चाच्या बाबतीत अमेरिकेनंतर चीन हा जगातील दुसरा देश आहे.

शिवाय, संसदेत सादर केलेल्या व्यवसाय अहवालात, केकियांग यांनी शनिवारी आपले जीडीपी लक्ष्य गेल्या वर्षीच्या 6.1 टक्क्यांवरुन 5.5 टक्क्यांवर आणले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com