Florida Plane Crash 9 Killed Dainik Gomantak
ग्लोबल

Plane Crash Video: भररस्त्यात विमान कोसळलं अन् आगीचा भडका उडाला! भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Florida Plane Crash 9 Killed: अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात रविवारी एका खासगी व्यावसायिक विमानाचा भीषण अपघात झाला.

Sameer Amunekar

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात रविवारी एका खासगी व्यावसायिक विमानाचा भीषण अपघात झाला. टेक्सासमधील ऑस्टिन येथून बहामासच्या दिशेने प्रवास करणारे ‘लियरजेट ६०’ हे विमान दक्षिण फ्लोरिडामध्ये कोसळले. या दुर्घटनेत विमानातील सर्व नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. विमान कोसळल्यानंतर रस्त्यावर मोठी आग लागली असून, अपघाताच्या ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे.

आकाशातून वेगाने खाली आले विमान, जमिनीवर आदळताच मोठा स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, हे खासगी विमान टेक्सासमधील ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बहामासच्या दिशेने रवाना झाले होते. विमानात एकूण नऊ जण प्रवास करत होते. मात्र, दक्षिण फ्लोरिडामध्ये प्रवासादरम्यान विमान अचानक खाली कोसळले.

विमान जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला. या अपघातामुळे परिसरात आगीच्या प्रचंड ज्वाळा उसळल्या. विमान रस्त्याच्या जवळ कोसळल्याने रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला. अपघातानंतर संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते. विशेष म्हणजे, हे विमान जवळच असलेल्या घरांपासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर कोसळले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विमानाचा अपघात ज्या ठिकाणी झाला, त्याच्या अगदी जवळून वाहनेही जात होती.

कारमधील प्रवाशांनी टिपला थरारक अपघात

विमान अपघाताचा थरारक व्हिडिओ काही वाहनचालकांनी आपल्या कारमधून चित्रित केला आहे. या व्हिडिओमध्ये विमान वेगाने आकाशातून खाली येताना दिसत आहे. त्यानंतर काही क्षणांतच विमान रस्त्याजवळ आदळते आणि मोठा स्फोट होतो.

विमान कोसळल्यानंतर रस्त्यावर आगीच्या ज्वाळा पसरल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. विमान घरांपासून आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांपासून अत्यंत कमी अंतरावर कोसळले होते. त्यामुळे या दुर्घटनेत आसपासच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या अपघातामुळे जवळच्या घरांचे किती नुकसान झाले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

FAA आणि NTSBकडून अपघाताचा तपास सुरू

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) या दुर्घटनेच्या तपासासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाच्या (NTSB) तपास पथकाला FAAची टीम सहकार्य करणार आहे.

ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते जिम रेनॉल्ड्स यांनी हे खासगी विमान असल्याचे स्पष्ट केले. विमानाचा टेल नंबर N722BD असल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, विमानातील नऊ जणांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. विमान कोसळण्यामागे तांत्रिक बिघाड, हवामान किंवा अन्य कोणते कारण होते, याचाही तपास केला जात आहे.

अपघातानंतर रस्ते बंद, परिसरात वीजपुरवठा खंडित

ही दुर्घटना मिलिट्री ट्रेल आणि १०व्या अ‍ॅव्हेन्यू नॉर्थ परिसरात घडली. अपघाताची माहिती मिळताच पाम बीच काउंटी शेरिफ कार्यालयाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील दोन्ही बाजूंचे रस्ते बंद करण्यात आले.

वाहनचालकांनी अपघातस्थळाच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. अग्निशमन दलासह विविध आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिक परिसरात काम करणाऱ्या एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जवळपास दोन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, या भीषण विमान दुर्घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली असून, तपासातून अपघाताचे नेमके कारण समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Ramlila Maidan Rally: रामलीला मैदानावर 1977 नंतरचे सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन; पण 'पुढे काय?' हा कळीचा प्रश्न कायम!

Goa Tourism: गोव्यासाठी केंद्राची नवी पर्यटन योजना, जुने गोवेतील ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणार; केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची माहिती

IND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी मोठा धक्का! 2 स्टार खेळाडू अचानक बाहेर, आता संघासमोर नवं आव्हान

RGP Congress Alliance: ''12 जागा द्या, नाहीतर स्वतंत्र लढा", आरजीचा काँग्रेसला अल्टीमेटम; आघाडीचा तिढा कायम

खरी कुजबुज: अन् सुतासारखे झाले सरळ

SCROLL FOR NEXT