Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानला अखेर मिळाली मदत! ड्रॅगन...

Pakistan Economic Crisis: महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Pakistan Economic Crisis: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना रोजच्या गरजा भागवण्यासाठी अडथळे पार करावे लागत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

पाकिस्तानचे सरकार जागतिक स्तरावरुन आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. आता पाकिस्तानच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे. चीनकडून पाकिस्तानला मोठी मदत केली असल्याची माहिती समोर आली आहे.

चीन डेव्हलपमेंट बॅंकेने पाकिस्तानच्या स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान (एसबीपी)ला 70 करोड डॉलर इतके कर्ज दिले आहे.

चीन( China )च्या बॅंकेकडून पैसे मिळाल्यानंतर पाकिस्तानचे वित्तमंत्री इशाक डार इशाक डार यांनी ट्विटवरुन ही माहिती दिली आहे. अल्हम्दुलिल्लाह !स्टेट बैंक ऑफ पाकिस्तानला चीन डेवलप्मेंट बॅंकेकडून 70 करोड़ डॉलर की धनराशि मिळाली असे ट्विट केले आहे.

दरम्यान, पाकिस्तान( Pakistan )ने आयएमएफकडून देखील कर्ज मागितले होते. मात्र आयएमएफने कर्ज देण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.

भारताने पाकिस्तान काय करतो याच्यावर पाकिस्तानचे भविष्य अवलंबून आहे असे म्हटले होते. त्याचबरोबर, पाकिस्तानला आर्थिक मदत करण्यावर भारत आणि पाकिस्तानचे असे संबंध नाहीत की भारताने स्वत: मदत करावी असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT