Accident in Canada dainik gomantak
ग्लोबल

कॅनडामध्ये झालेल्या भीषण अपघातात 5 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

कॅनडातील हृदयद्रावक घटना; भीषण अपघातात 5 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

कॅनडा : युक्रेन-रशिया युद्धादरम्यान दोन भारतीय भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशांत दु:खाची लाट पसरली होती. हे दु:ख कमी होते ना होते तोपर्यंत देशात आणकी एक दु:खद घटनेची बातमी येऊन धडकली आहे. यावेळी कॅनडामध्ये एक भीषण अपघातात झाल्याचे समोर येत असून त्यात 5 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी कॅनडातील टोरंटोजवळ ओंटारियो हायवेवर झाला. (Five Indian students killed in accident in Canada)

कॅनडातील ओंटारियो हायवेवर (Highway) शनिवारी विद्यार्थ्यांची कार ट्रॅक्टर-ट्रेलरला धडकल्याने हा अपघात झाला. ज्यात 5 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर इतर दोन विद्यार्थी रुग्णालयात दाखल आहेत.

कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी (Indian High Commissioner) सोमवारी या घटनेची माहिती दिली. तसेच त्यांनी ट्विट करत, या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले की, आम्ही पीडितांच्या मित्रांना सर्व मदत देण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय राजनैतिक अधिकारी अजय बिसारिया यांनी ट्विट करत म्हटले की, 'कॅनडातील हृदयद्रावक घटना. तसेच पीडितांच्या कुटुंबियांप्रती आमची संवेदना असून भारतीय उच्चायुक्तालय मदतीसाठी पीडितांच्या मित्रांच्या (Friends) संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

या अपघातात हरप्रीत सिंग, जसपिंदर सिंग, करणपाल सिंग, मोहित चौहान आणि पवन कुमार अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असल्याचे ओंटारियो प्रांतीय पोलिसांनी (Police) सांगितले.

ही बातमी कळताच, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांनी शोक व्यक्त केला. तसेच त्यांनी ट्विट करत, 'कॅनडामध्ये 5 भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खूप दुःख झाले. आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. कॅनडातील (Canada) भारतीय उच्चायुक्तालय पीडितांना संपूर्ण मदत करेल. या घटनेत जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना (Students) जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: "माझे घर" योजना सप्टेंबरपासून लागू - मुख्यमंत्री

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT