Ravi Chaudhary Dainik Gomantak
ग्लोबल

US Air Force: अभिमानास्पद! अमेरिकेच्या हवाई दलाच्या सहाय्यक संरक्षण सचिवपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी

हे पद अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनच्या सर्वोच्च पदांपैकी एक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

US Air Force: अमेरिकेच्या हवाई दलाच्या सहाय्यक संरक्षण सचिवपदासाठी भारतीय-अमेरिकन रवी चौधरी यांच्या नावाला अमेरिकन सिनेटने मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनच्या सर्वोच्च पदांपैकी एक आहे.

बुधवारी सिनेटने चौधरी, माजी हवाई दल अधिकारी यांच्या नामांकनाला 29 विरुद्ध 65 मतांनी बहुमत दिले. या 65 मतांमध्ये विरोधी रिपब्लिकन पक्षाच्या 12 पेक्षा जास्त मतांचा समावेश आहे.

चौधरी यांनी यापूर्वी यूएस परिवहन विभागामध्ये वरिष्ठ कार्यकारी म्हणून काम केले होते, जेथे ते फेडरल एव्हिएशन अथॉरिटी (एफएए) मधील कमर्शियल स्पेसच्या कार्यालयात ते अधुनिक कार्यक्रम आणि नवोपक्रमाचे संचालक होते.

त्यांनी FAA च्या व्यावसायिक अंतराळ वाहतूक मोहिमेसाठी प्रगत विकास आणि संशोधन कार्यक्रमांचे निरीक्षण केले आहे.1993 ते 2015 या कालावधीत यूएस एअरफोर्समधील सेवेदरम्यान चौधरी यांनी विविध मोहिमा पूर्ण केल्या.

C-17 पायलट म्हणून, त्यांनी अफगाणिस्तान आणि इराकमधील अनेक लढाऊ मोहिमांसह जागतिक मोहिमा पार पाडल्या आहेत. याशिवाय, इराकमधील मल्टी-नॅशनल कॉर्प्समध्ये कार्मिक 'रिकव्हरी सेंटर' चे संचालक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

रवी चौधरी यांनी जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी DLS मधून कार्यकारी नेतृत्व आणि नवोपक्रम या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. तो फेडरल एक्झिक्युटिव्ह इन्स्टिट्यूटचे पदवीधर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT