Goa Petrol-Diesel Price : देशातील इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे ताजे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel Price Dainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीने 15 महिन्यांची नीचांकी पातळी गाठली आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या आणि ब्रेंटच्या (क्रूड) किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे त्याचा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर कोणताही परिणाम होणार नाही.

आज (16 मार्च) देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशात आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

देशातील चार प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई पेट्रोल 106.31  डिझेल 94.27,  दिल्ली पेट्रोल 96.72 डिझेल 89.62, चेन्नई पेट्रोल 102.63 डिझेल 94.24 आणि कोलकात्ता पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 रूपये दराने विकले जात आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 90.29

Goa Petrol-Diesel Price
Credit Suisse Bank: अमेरिकेनंतर युरोपच्या बँकिंग क्षेत्रात भूकंप; स्विस बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com