America Police  Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेतील शिकागोमध्ये गोळीबार; 8 जणांनी गमावला जीव

अमेरिकन मीडियानुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 42 जण जखमी झाले.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. अमेरिकन मीडियानुसार, या आठवड्याच्या शेवटी शिकागोमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या, ज्यामध्ये 8 जणांनी जीव गमावला तर 16 जण जखमी झाले.

गोळीबाराची पहिली घटना शुक्रवारी सायंकाळी 5:45 च्या सुमारास घडली. शिकागोच्या दक्षिण किलपॅट्रिक भागात एका 69 वर्षीय व्यक्तीची त्याच्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांमध्ये अल्पवयीन तसेच 62 वर्षीय महिलेसह सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. ब्राइटन पार्क, साउथ इंडियाना, नॉर्थ केडजी अव्हेन्यू, हम्बोल्ट पार्क यासह अनेक भागात या घटना घडल्याचे अहवालात म्हटले आहे.

अमेरिकन मीडियानुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 42 जण जखमी झाले. अमेरिकेत तुरळक गोळीबाराबरोबरच सामूहिक गोळीबार ही देखील मोठी समस्या बनत आहे. गन वायलेन्स आर्काइव्ह या संशोधन गटाच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये अमेरिकेत आतापर्यंत 140 हून अधिक सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT