Philippines Fire Dainik Gomantak
ग्लोबल

फिलिपाईन्समध्ये कपड्याच्या फॅक्टरीला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू

Philippines Fire: फिलिपाईन्समध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील एका कपड्याच्या कारखान्याला आग लागली, त्यात 16 जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Philippines Fire: फिलिपाईन्समध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील एका कपड्याच्या कारखान्याला आग लागली, ज्यात 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कपड्यांची फॅक्टरी दोन मजली इमारत होती, जी जळून खाक झाली. यासोबतच गोदाम आणि कामगारांच्या निवासासाठीही त्याचा वापर केला जात होता.

दरम्यान, राजधानी मनिला येथील एका कपड्याच्या कारखान्यात आग लागली. या अपघातात (Accident) 16 जणांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी लागलेल्या आगीत दोन मजली इमारत पूर्णपणे जळून खाक झाली.

घटनेवेळी कर्मचारी झोपले होते

वृत्तानुसार, या दुर्घटनेची माहिती देताना अग्निशमन दलाचे प्रमुख मार्सेलो रगुंडियाज यांनी सांगितले की, तीन जण बचावले आहेत. रिपोर्टनुसार, ही आग इमारतीच्या मध्यभागी लागली. त्यामुळे बहुतांश लोकांना त्यातून बाहेर पडता आले नाही.

आगीच्या वेळी पूर, जाम आणि चुकीच्या पत्त्यामुळे अग्निशमन दलाला पोहोचण्यात उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिका-यांनी सांगितले की, मृतांमध्ये बहुतेक कारखान्याचे कामगार होते जे घटनेच्या वेळी खोलीत झोपले होते.

मृतांमध्ये कारखान्याचा मालक आणि त्याच्या मुलाचाही समावेश आहे.

अग्निशमन दलाचे अधिकारी नहुम तरोजा यांनी सांगितले की, खोलीच्या बाहेर कॉरिडॉरमध्ये काही लोक मृतावस्थेत आढळले. या मृतांमध्ये कारखाना मालक आणि त्याच्या मुलाचाही समावेश आहे.

तरोजा यांनी सांगितले की, आग लागल्याने तीन जणांनी दुमजली कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली आणि ते जखमी झाले.

जखमींना तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. पूर आणि वाहतूक कोंडी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना चुकीचा पत्ता दिल्याने पथक थोडे उशिरा पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT