Kim Jong-un Dainik Gomantak
ग्लोबल

कोरोनानंतर उत्तर कोरियात तापाचे थैमान, 21 जणांचा मृत्यू

पहिल्यांदाच कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियामध्ये शुक्रवारी गूढ तापाने ग्रस्त 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

पहिल्यांदाच कोरोना (Corona) महामारीचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियामध्ये (North Korea) शुक्रवारी गूढ तापाने ग्रस्त 21 जणांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे मृत्यू झाले आहेत की नाही हे KCNA वृत्तसंस्थेने सांगितले आहे. तथापि, KCNA ने शुक्रवारी पुष्टी केली की मृतांपैकी एकाचा कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron Variant) प्रकारामुळे मृत्यू झाला. (Fever kills 21 in North Korea after Corona)

KCNA ने सांगितले की, एप्रिलच्या अखेरीपासून देशात तापाने आजारी असलेल्या 2 लाख 80 हजारांहून अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहे. तापामुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. KCNA ने सांगितले की, शनिवारी पहाटे सत्ताधारी पक्षाची बैठक झाली, ज्यामध्ये अध्यक्ष किम जोंग उन देखील त्यावेळी उपस्थित होते. या बैठकीत एक अहवाल सादर करण्यात आला, ज्यामध्ये हा आजार देशाच्या स्थापनेनंतरची सर्वात मोठी आपत्ती म्हणून समोर आला असला तरी तो टाळता येऊ शकतो, असे यावेळी म्हटले.

सध्या या गूढ तापाचे कारण समजू शकलेले नाहीये. मात्र, ताप येण्यामागे कोरोना हेच प्रमुख कारण असावे असा संशय आहे. तसेच उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन (Kim Jong-un) यांनी गुरुवारी राष्ट्रीय लॉकडाउन आदेश दिल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी अँटी-व्हायरस कमांड सेंटरला भेट दिली आहे. पक्ष संघटनांच्या साथीच्या रोगविरोधी प्रतिसादाची कमतरता आणि बेजबाबदारपणामुळे आरोग्य संकट उद्भवले आहे आणि शक्य तितक्या लवकर त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

Breast Cancer Screening: 2.15 लाख महिलांची तपासणी, 3,925 जणींमध्ये संशयित लक्षणे! गोव्यात 96 महिलांना स्तन कर्करोगाचे निदान

US Iran Tensions: मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प अधिकच आक्रमक! इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ल्याचे सावट; सीमेवर हाय अलर्टवर

SCROLL FOR NEXT