Faruk Ozer, the founder of Thodex Dainik Gomantak
ग्लोबल

चार लाख लोकांना लुबडणाऱ्या ओझर बंधूंना 11 हजार वर्षांचा तुरुंगवास

Turkish crypto exchange: या प्रकरणी एकूण 83 जणांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर 21 दोषींना 40,564 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Ashutosh Masgaunde

Faruk Ozer, the founder of Turkish crypto exchange Thodex, Along with brother and sister sentenced to 11,196 years jail:

दरम्यान, तुर्कस्तानमधील एका क्रिप्टो कंरन्सीच्या संस्थापकाला त्याचा भाऊ आणि बहिणीसह 11,196 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याशिवाय त्यांना 50 लाख डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तुर्की क्रिप्टो एक्सचेंज थोडेक्सचे संस्थापक फारुक ओझर व्यतिरिक्त, त्याची बहीण सेराप ओझर आणि भाऊ ग्वेन ओझर यांनाही 11,196 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तुर्की क्रिप्टो एक्सचेंज थोडेक्सचा संस्थापक फारुक ओझर याने 4 लाख लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यानंतर ते एप्रिल २०२१ मध्ये बेपत्ता झाले. दरम्यान, संधी शोधून तो अल्बेनियाला पळून जाण्यात यशस्वी झाला. इंटरपोलने नोटीस बजावल्यानंतर एप्रिल 2022 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती.

बरोबर एक वर्षानंतर इंटरपोल पोलिसांनी त्याला तुर्कीकडे प्रत्यार्पण केले. त्यासोबतच भाऊ आणि बहिणीशिवाय तुर्कीतील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंज थोडेक्सशी संबंधित चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अटक करून तुरुंगात टाकण्यात आले आहे.

या प्रकरणी एकूण 83 जणांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर 21 दोषींना 40,564 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इस्तंबूल न्यायालयाने ओझर आणि त्याच्या दोन भावंडांना समान तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या सर्व गंभीर फसवणूक तसेच गुन्हेगारी संघटनेचे नेतृत्व करणे आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दोषी आढळले.

चार लाखांहून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ओझरने दहावीही उत्तीर्ण केलेली नाही. व्यापारी कुटुंबातील असलेल्या ओझरने 2017 मध्ये थोडेक्सची स्थापना केली.

वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ओझरने ही कंपनी तयार करून 4 लाख लोकांची फसवणूक केली. आर्थिक गुन्हे करायचे असते तर एवढी मोठी कंपनी निर्माण केली नसती, असे ओझरचे म्हणणे आहे.

तुर्कस्तान मोठ्या प्रमाणावर तुरुंगवासाची शिक्षा देण्यासाठी ओळखले जाते. युरोपियन युनियनमध्ये सहभागी होण्यासाठी तेथे 2004 मध्ये फाशीची शिक्षा रद्द केली. त्यानंतर अशा प्रकारच्या शिक्षेचे प्रमाण वाढले.

काय आहे प्रकरण?

सरकारी वकिलांनी सांगितले की, ओझरने एप्रिल 2021 मध्ये तुर्कीतून पळून गेल्यावर ग्राहकांच्या मालमत्तेतील 250 दशलक्ष लिरा गुप्त खात्यांमध्ये हस्तांतरित केले होते.

आरोपात म्हटले आहे की ओझर बंधूंनी ग्राहकांचे एकूण 356 दशलक्ष लीराचे नुकसान केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

Goa Crime: 'पूजा नाईक'च्या ताब्यातील आणखी चार कारगाड्या जप्त! म्हार्दोळ पोलिसांनी आवळल्या 'एजंट'च्या मुसक्या

Kalasa Banduri Project: 'कळसा-भांडुरा'बाबतीत कर्नाटकच्या अडचणी वाढल्या! आता ‘प्रवाह'च्या बैठकीकडे लक्ष

Rashi Bhavishya 25 October 2024: शत्रूंपासून सावधान! प्रवासादरम्यान होऊ शकते मोठी फसवणूक; जाणून घ्या काय सांगतयं या राशीचं भविष्य

अन्.. विठूरायाच्या दर्शनाचे स्वप्न राहिले अपुरे..! डिचोलीच्या बाजारात कोसळून वृद्धा मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT