Arrested  Dainik Gomantak
ग्लोबल

Nepal: नेपाळच्या माजी उपपंतप्रधानाला अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Fake Bhutan Refugee Scam: नेपाळचे माजी उपपंतप्रधान आणि सीपीएन-यूएमएलचे ज्येष्ठ नेते बहादूर रायमाझी यांना रविवारी अटक करण्यात आली.

Manish Jadhav

Fake Bhutan Refugee Scam: नेपाळचे माजी उपपंतप्रधान आणि सीपीएन-यूएमएलचे ज्येष्ठ नेते बहादूर रायमाझी यांना रविवारी अटक करण्यात आली.

बनावट भूतानी निर्वासित घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वी अटक वॉरंट जारी केल्यानंतर ते फरार होते. पोलिसांनी ही माहिती दिली. रायमाझी यांना काठमांडूपासून 10 किमी दक्षिणेला बुधा नीलकंठ परिसरातून अटक करण्यात आली.

दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “बहादूर रायमाझी यांना रविवार अटक करण्यात आली आहे. भूतान निर्वासित घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर ते फरार झाले होते.

गृहमंत्र्यांनाही अटक करण्यात आली आहे

भूतान निर्वासित घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले रायमाझी हे दुसरे मोठे नेते आहेत. यापूर्वी, माजी गृहमंत्री आणि प्रभावशाली नेपाळी काँग्रेसचे नेते बाल कृष्ण खांड यांना बुधवारी भूतान निर्वासित घोटाळ्यातील कथित सहभागाबद्दल अटक करण्यात आली होती.

हा घोटाळा नेमका काय होता

या घोटाळ्यांतर्गत नेपाळी नागरिकांना (Citizens) भूतानचे निर्वासित असल्याची बनावट कागदपत्रे बनवून अमेरिकेत पाठवले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक ऑडिओ टेप जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये माजी पंतप्रधान देउबा यांच्या पत्नी आरजू राणा देउबा आणि खांड यांच्या पत्नी मंजू खांड यांच्यावर या घोटाळ्यातील पीडितांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप आहे.

रायमाझी यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे

रायमाझी यांचे पुत्र संदीप याला यापूर्वीच अटक (Arrested) करण्यात आली आहे. यासह बनावट निर्वासित घोटाळ्याप्रकरणी एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रचंड यांनी कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले

याआधी, शुक्रवारी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी बनावट भूतान निर्वासित घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचा संकल्प केला होता.

प्रचंड यांनी विरोधी पक्षांना या घोटाळ्यामागील भ्रष्ट चेहरे उघड करण्याच्या त्यांच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

तसेच, पंतप्रधान प्रचंड यांनी शुक्रवारी रवी लामिछाने यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (आरएसपी) आणि राजेंद्र लिंगदेन यांच्या नेतृत्वाखालील हिंदुत्ववादी आणि राजेशाही समर्थक राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष (आरपीपी) यांच्याशी बैठक घेतली, ज्यामध्ये भूतान निर्वासित घोटाळ्याचा मुद्दा पुढे आला.

भेटीदरम्यान प्रचंड म्हणाले की, बनावट भूतान निर्वासित घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

भ्रष्टाचार, बनावट निर्वासित घोटाळा आणि इतर आर्थिक अनियमिततेची सरकार प्रामाणिकपणे आणि ठामपणे चौकशी करेल, अशी ग्वाही प्रचंड यांनी दिली. त्यांनी आरएसपी आणि आरपीपीला नेपाळ सरकारच्या भ्रष्टाचारामागील चेहरे उघड करण्याच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

IND vs AUS 5th T20: मालिकेचा फैसला 'गाबा'वर! सूर्या ब्रिगेड देणार कांगारुंना कडवं आव्हान, कसा आहे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Viral Video: याला म्हणतात खरी जिद्द! हात नसतानाही पायाने बाईक चालवून त्याने नियतीलाच आव्हान दिलं, पठ्ठ्याचा जोश पाहून सर्वच हैराण

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

SCROLL FOR NEXT