Imam Mahjoub Mahjoubi 
ग्लोबल

France: राष्ट्रध्वजाला सैतान म्हणणाऱ्या इमामाची फ्रान्समधून हकालपट्टी

French Flag: दरम्यान, फ्रान्स इन्फोने वृत्त दिले की, इमाम महजौबी नुकताच ट्युनिशियाला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये दिसला.

Ashutosh Masgaunde

Expulsion from France of Imam Mahjoub Mahjoubi who called French national flag the devil:

फ्रान्सने आपल्या राष्ट्रध्वजाला सैतान म्हटल्याबद्दल एका मुस्लिम धर्मगुरूला देशातून हाकलून दिले आहे.

ट्युनिशियातील आरोपी इमाम महजूब महजौबीला अटक केल्यानंतर 12 तासांच्या आत ही कारवाई करण्यात आली.

सोशल मीडियावर या कारवाईची माहिती देताना गृहमंत्री गेराल्ड डारमॅनिन यांनी लिहिले की, कोणालाही 'काहीही' म्हणण्याची किंवा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कट्टरपंथी इमामच्या टिप्पण्या अस्वीकार्य आहेत. फ्रान्सच्या नवीन इमिग्रेशन कायद्यानुसार इमामची त्वरीत हकालपट्टी करण्यात आली आहे.

वास्तविक, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महजौबीने फ्रान्सच्या तीन रंगाच्या ध्वजाला शैतान म्हटले आहे.

महजौबी दक्षिण फ्रान्समधील बागनोल्स-सूर-सीझ येथील एटौबा मशिदीशी संबंधित होते. आपल्या बचावात त्यांनी सांगितले की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे.

दरम्यान, फ्रान्स इन्फोने वृत्त दिले की, महजौबी गुरुवारी संध्याकाळी ट्युनिशियाला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये दिसला. प्रसारमाध्यमांनी हकालपट्टी आदेशाचा काही भाग प्रसिद्ध केला आहे. त्यात महजौबीने इस्लामची मागासलेली, असहिष्णु आणि हिंसक संकल्पना व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT