चीन (China) आणि लाओस दरम्यान रेल्वे मार्ग सुरू होत आहे.हे तयार करण्यासाठी सुमारे 44, 230 कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा 1035 किमीचा रेल्वे मार्ग या आठवड्यात मालवाहतुकीसाठी खुला होणार आहे. कोरोना विषाणूच्या (Corona) पार्श्वभूमीवर हा ट्रक अद्याप सर्व सामान्यांसाठी खुला होणार नाही. लाओसमधील कुनमिंग-व्हिएंटियान रेल्वेचा (Railway) 418 किमी विभाग लाओस-चीन रेल्वे कंपनीद्वारे (Company) चालविण्यात येईल, ज्यांची 70 टक्के भागीदारी आहे. उर्वरित 30 टक्के लाओशियन राज्य कंपनीच्या मालकीची आहे.
या संपूर्ण ट्रॅकमध्ये (Track) 167 बोगदे करण्यात आले आहेत. हा ट्रक (Truck) सुरू झाल्यास वाहतुकीच्या वेळेत सुमारे 8 तासांची बचत होऊ शकते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) आणि लाओसचे अध्यक्ष थोंग्लोन सिसोलिथ 3 डिसेंबर रोजी व्हिडिओ (Video Conference) कॉन्फरन्सद्वारे मार्ग सुरू करतील. चीन थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार, मलेशिया आणि सिंगापूर यांना कुनमिंग- रेल्वेमार्ग जोडण्यासाठी भविष्यातील संभाव्य नेटवर्कचा (Network) दुवा तयार करत आहे. यामुळे दक्षिण चीनला पोर्ट आणि निर्यात बाजारात (Export market) अधिक प्रवेश मिळेल. या ट्रकवर 160 किमी प्रतितास वेगाने गाड्या धावतील.
वॉशिंग्टनमधील (Washington) सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटचे स्कॉट मॉरिस यांनी अहवाल दिला की लाओसमध्ये (Laos) 21 स्थानके बांधली गेली आहेत. परदेशी पोर्टपर्यंत लवकर पोहोचता यावे यासाठी ही स्थानके चीनच्या (China) गरजेनुसार बांधण्यात आली आहेत. ही स्टेशने ग्रामीण लाओसमधील शेतकऱ्यांना (Farmers) बाजारपेठेशी (Market) जोडतील जागतिक बँकेने जारी केलेल्या अहवालात असे सांगितले आहे की चीन-लाओस रेल्वे (Laos-China Railway) सुरू झाल्याने लाओसच्या (Laos) एकूण महसुलात 21 टक्क्यांनी वाढ करणे शक्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.