मलेशियन विमानात 'बॉम्ब' अफवेने उडाली खळबळ

मलेशियातल्या (Malaysia) एका फोन कॉलवर आम्हाला मिळालेली माहिती निराधार होती.
News of bomb in Malaysian plane created panic
News of bomb in Malaysian plane created panicDainik Gomantak
Published on
Updated on

बांगलादेशच्या (Bangladesh) नागरी उड्डाण प्राधिकरणाने बुधवारी रात्री जाहीर केले की ढाकाच्या (Dhaka) हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर (HSIA) प्रवासी, त्यांचे सामान आणि विमानाची कसून झडती घेतल्यानंतर मलेशियन (Malaysia) एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची बातमी निराधार आहे. एचएसआयएचे कार्यकारी संचालक ग्रुप कॅप्टन एएचएम तौहीद-उल-एहसान यांनी विस्तृत सुरक्षा शोध पूर्ण झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले, “मलेशियातल्या एका फोन कॉलवर आम्हाला मिळालेली माहिती निराधार होती. काहीही सापडले नाही.

ते म्हणाले की आर्मी कमांडो, हवाई दलाच्या बॉम्ब डिस्पोजल युनिट्स, स्पेशलाइज्ड अँटी क्राईम रॅपिड अॅक्शन बटालियन (आरएबी) आणि विविध गुप्तचर संस्था आणि अग्निशामक दलांना 'आमच्या एसओपी' किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (Malaysia Plane) नुसार पाचारण करून शोध मोहीम राबवण्यात आली. एहसानने कॉलरची ओळख उघड करण्यास नकार दिला, परंतु RAB ला कॉल प्राप्त झाल्याचे सांगितले.

News of bomb in Malaysian plane created panic
पाकिस्तान कंगाल,मंत्र्यांच्या दौऱ्यावरही इम्रान सरकारची बंदी

मलेशियन अधिकारी काय म्हणाले?

त्यानंतर मलेशियाच्या अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेतून आणि गुप्तचर अहवालांवरून असे सूचित करण्यात आले आहे की विमानात असा कोणताही धोका नव्हता. ते म्हणाले की विमानाच्या केबिन, प्रवासी आणि त्यांच्या सामानाची SOP चे पालन करण्यासाठी कसून तपासणी केली गेली कारण ही सर्वांच्या सुरक्षिततेची बाब आहे. विमानतळ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, विमानात 135 प्रवासी होते, ज्यात 134 बांगलादेशी आणि एका मलेशियन नागरिकाचा समावेश होता.

रात्री विमान आपत्कालीन स्थितीत उतरले

बुधवारी रात्री 9.40 च्या सुमारास विमानाने HSIA येथे आपत्कालीन लँडिंग केले, त्यानंतर कमांडो आणि सुरक्षा एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या आणि अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांना सतर्क ठेवण्यात आले. विमानतळाच्या अधिका-यांनी आधी सांगितले होते की प्रवाशांना नंतर कसून सुरक्षा तपासणीनंतर खाली उतरवण्यात आले, तर विमानाला सामान आणि केबिन तपासण्यासाठी टर्मिनल क्षेत्रापासून दूर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com