Emmanuel Macron Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: ट्रम्पच्या ताफ्यासाठी थांबवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची गाडी, न्यूयॉर्कमधील व्हिडिओ तूफान व्हायरल, मॅक्रॉन म्हणाले, 'तुमच्यासाठी सगळं बंद...'

Emmanuel Macron Viral Video: मंगळवारी (23 सप्टेंबर) न्यूयॉर्कमध्ये मोठा गोंधळ उडाला, जेव्हा वाहतूक पोलिसांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीच गाडी थांबवली.

Manish Jadhav

New York Traffic Jam Video: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात वाहतूक कोंडीमुळे एक विचित्र घटना घडली, ज्याची सध्या जगभरात चर्चा होत आहे. मंगळवारी (23 सप्टेंबर) न्यूयॉर्कमध्ये मोठा गोंधळ उडाला, जेव्हा वाहतूक पोलिसांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीच गाडी थांबवली. या घटनेनंतर मॅक्रॉन यांनी तात्काळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करुन तक्रार केली. या घटनेचा व्हिडिओ आता जगभरात व्हायरल झाला आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) एक लांबलचक भाषण दिल्यानंतर मॅक्रॉन आपले दिवसाचे काम संपवून दूतावासाकडे परत जात होते. त्याचवेळी, ते न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यांवरील मोठ्या वाहतूक कोंडीत अडकले. याच कोंडीत वाहतूक पोलिसांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्याला रस्ता देण्यासाठी मॅक्रॉन यांची गाडी थांबवली. यामुळे मॅक्रॉन यांना रस्त्यावरच थांबावे लागले.

दरम्यान, या प्रकाराने निराश झालेले मॅक्रॉन आपल्या गाडीतून उतरले आणि त्यांनी पोलिसांना रस्ता मोकळा करण्याबाबत विचारले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी मॅक्रॉन यांना म्हणतो, "माफ करा सर, सर्वकाही बंद आहे." त्यानंतर मॅक्रॉन यांनी मजेशीर अंदाजात रस्त्यावरच एका बॅरिकेडजवळ उभे राहून ट्रम्प यांना फोन केला. मॅक्रॉन ट्रम्प यांना म्हणाले, "तुम्ही कसे आहात? तुम्हाला काय झाले ते माहित आहे का? मी रस्त्यावर उभा आहे, कारण तुमच्यामुळे सर्वकाही बंद आहे."

अमेरिकन मीडियाच्या रिपोर्टनुसार, या घटनेवेळी दोन्ही नेत्यांमध्ये हसत-खेळत संवाद झाला. ट्रम्प यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले.

फ्रान्सने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राची दिली मान्यता

मॅक्रॉन यांच्या गाडीला अडकवण्याच्या घटनेच्या एक दिवस आधी, त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत एक मोठी घोषणा केली होती. फ्रान्सने आता पॅलेस्टाईनला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. याआधी मोनॅको, माल्टा, लक्झेंबर्ग आणि बेल्जियमने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांच्या दरम्यान इस्रायल-पॅलेस्टाईन वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली, जिथे मॅक्रॉन यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

मॅक्रॉन यांनी UN बैठकीत सांगितले की, "आज फ्रान्स पॅलेस्टाईनला मान्यता देत आहे." ते पुढे म्हणाले की, "आपल्याला शांततेसाठी काम करावे लागेल." पश्चिम आशियातील शांतता प्रक्रियेला पुन्हा चालना देण्यासाठी फ्रान्सने हे पाऊल उचलले आहे, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT