Sheikh Tamim bin Hamad Al Thani & Recep Tayyip Erdoğan Dainik Gomantak
ग्लोबल

Turkiye Earthquake: कतारच्या अमीराने घेतली एर्दोगान यांची भेट, PAK ची झाली कोंडी; वाचा संपूर्ण प्रकरण

Turkiye Earthquake: भूकंपग्रस्त तुर्कीला कतारच्या अमीरची भेट दोन कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे, पहिली- गेल्या सोमवारच्या भूकंपानंतर परदेशी नेत्याची तुर्कीला झालेली ही पहिली भेट आहे.

Manish Jadhav

Sheikh Tamim bin Hamad Al Thani, Emir Of Qatar: कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी रविवारी इस्तंबूलमध्ये तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांची भेट घेतली.

भूकंपग्रस्त तुर्कीला कतारच्या अमीरची भेट दोन कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे, पहिली- गेल्या सोमवारच्या भूकंपानंतर परदेशी नेत्याची तुर्कीला झालेली ही पहिली भेट आहे.

दुसरीकडे, या भेटीला महत्त्व देणारे दुसरे कारण म्हणजे अलीकडेच तुर्कीने शेवटच्या क्षणी अंकारा येथे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे यजमानपद नाकारले होते.

तुर्कीच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला (Pakistan) चांगलाच फटका बसला होता.

शाहबाज यांनी तुर्की दौऱ्याची घोषणा केली होती

खरं तर, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तुर्कीच्या (Turkey) लोकांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी बुधवारी (8 फेब्रुवारी) अंकाराला भेट देण्याची घोषणा केली होती.

पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्री मरियम औरंगजेब यांनी माहिती दिली होती की, पंतप्रधान शाहबाज शरीफ बुधवारी तुर्कस्तानला जाणार आहेत.

त्यामुळे गुरुवारी पाकिस्तानमध्ये होणारी सर्वपक्षीय बैठकही रद्द करण्यात आली. मात्र, तुर्की सरकारने मदत आणि बचाव कार्यात व्यस्त असल्याचे कारण देत पाकिस्तानी पंतप्रधानांचा दौरा रद्द केला.

तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाने हाहाकार माजवला आहे

गेल्या सोमवारी (6 फेब्रुवारी) दोन मोठ्या भूकंपांनी दक्षिण-पूर्व तुर्की आणि सीरियाचा मोठा भाग उद्ध्वस्त केला होता. तुर्कीमध्ये 24,500 हून अधिक लोक मरण पावले, तर सीरियामध्ये 4,500 लोक मरण पावले. हजारो लोक जखमी झाले आणि मोठ्या प्रमाणात परंतु अज्ञात लोक बेपत्ता झाले.

यूएन आपत्ती निवारण समन्वयक मार्टिन ग्रिफिथ्स म्हणाले की, मृतांची संख्या किमान दुप्पट असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT