Elon Musk  Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk: 'जर वन बिग ब्युटीफुल बिल मंजूर झालं तर दुसऱ्याच दिवशीच...' एलन मस्क यांनी दिले नवीन पार्टी स्थापन करण्याचे संकेत

Elon Musk Slams Trump's One Big Beautiful Bill: अब्जाधीश एलन मस्क यांनी पुन्हा एकदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या "वन बिग, ब्युटीफुल बिल" वर जोरदार टीका केली.

Manish Jadhav

Elon Musk New Political Party: डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि सल्लागार राहिलेले अब्जाधीश एलन मस्क यांनी पुन्हा एकदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या "वन बिग, ब्युटीफुल बिल" वर जोरदार टीका केली. मस्क यांनी ट्रम्प यांच्या बहुचर्चित विधेयकाचे वर्णन वेडेपणा आणि सामान्य करदात्यांवर ओझे असे केले. यासोबतच, त्यांनी इशारा दिला की, जर सिनेटने हे विधेयक मंजूर केले तर ते दुसऱ्या दिवशी "अमेरिका पार्टी" नावाच्या नवीन राजकीय पक्षाची स्थापना करतील.

दरम्यान, हे विधेयक ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील प्रमुख धोरण आहे, ज्यामध्ये संरक्षण, ऊर्जा आणि सीमा सुरक्षेसाठी मोठ्या आर्थिक तरतूदीची मागणी आहे. तसेच, पोषण आणि आरोग्य सेवांमध्ये कपात करण्याची तरतूद देखील केली आहे. काँग्रेसनल बजेट ऑफिसने अहवाल दिला की, पुढील दहा वर्षांत हे विधेयक राष्ट्रीय तूट सुमारे 3.3 ट्रिलियनने वाढवेल.

मस्क यांनी एक्सवर लिहिले की, "हे विधेयक कर्ज मर्यादा पाच ट्रिलियन डॉलर्सने वाढवते. हे स्पष्ट आहे की, आपण आता एका पक्षीय देशात राहतो- 'पोर्की पिग पार्टी'! त्यामुळे आता एका नवीन पक्षाची गरज वाटू लागली आहे, जो खरोखर अमेरिकन जनतेची सेवा करेल."

एवढ्यावरच न थांबता त्यांनी रिपब्लिकन नेत्यांवर विशेषतः हाऊस फ्रीडम कॉकसचे अध्यक्ष अँडी हॅरिसवर यांच्यावरही सडकून टीका केली. मस्क म्हणाले की, "जर तुम्ही सरकारी खर्च कमी करण्याच्या नावाखाली निवडून आलात आणि नंतर कर्जाची मर्यादा वाढवणाऱ्या विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे."

'...तर दुसऱ्या दिवशी एक नवीन पक्ष स्थापन करणार'

मस्क स्पष्ट शब्दात म्हणाले की, "जर हे विधेयक मंजूर झाले तर मी दुसऱ्याच दिवशी 'अमेरिका पार्टी' नावाचा पक्ष स्थापन करेन. डेमोक्रॅट-रिपब्लिकनच्या या एकपक्षीय व्यवस्थेला आपल्याला पर्याय हवा आहे, जेणेकरुन सामान्य लोकांचा आवाज उठवता येईल."

ट्रम्प यांच्याशी मैत्री तुटली, आता राजकीय कटुता निर्माण झाली

एकेकाळी ट्रम्प यांचे जवळचे सल्लागार असलेले एलन मस्क यांना 'गव्हर्नमेंट एफिशिएन्सी विभागाचे' प्रमुख बनवण्यात आले होते, परंतु त्यानंतर लवकरच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. मस्क यांनी दावा केला की, त्यांच्या पाठिंब्याशिवाय ट्रम्प निवडणूक (Election) हरले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात छापा! 8 मोबाईलसह तंबाखू हस्तगत; तुरुंगातील रामभरोसे कारभार उघड

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

Goa Coconut Price: बाप्पांचे विसर्जन झाले, तरी नारळ अजून भडकलेलेच; चिबूड, तवशांचीही आवक वाढली

Rashi Bhavishya 07 September 2025: नोकरीत संयमाने काम केल्यास चांगले यश , आज मेहनतीपेक्षा हुशारी जास्त उपयोगी ठरेल

SCROLL FOR NEXT