Elon Musk
Elon Musk Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk दहा दिवसानंतर पुन्हा ट्विटरवर अ‍ॅक्टीव; शेअर केले 'हे' 4 ट्वीट्स

दैनिक गोमन्तक

टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मिडीयावर चर्चेत असतात. एलॉन मस्क यांचे ट्वीट्स हे अनेक वेळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. पण 21 जूननंतर एलॉन (Elon Musk) यांनी ट्विटरवर एकही ट्वीट शेअर केले नव्हते. पण आता एलॉन हे दहा दिवसांनंतर आज ट्विटरवर अ‍ॅक्टीव झाले आहेत. त्यांनी दहा दिवसांनंतर काही ट्वीट्स शेअर केले आहेत. पाहूयात एलॉन यांनी पोस्ट केलेले ट्वीट्स कोणते आहेत.

एलॉन मस्क यांनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट

दहा दिवस ट्विटरवर अ‍ॅक्टीव नसणाऱ्या एलॉन मस्क यांनी चार ट्वीट्स शेअर केले आहेत. त्यामधील एका ट्वीटमध्ये त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्यासह फोटो शेअर केला. 'काल पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची संधी मिळाली.' असं कॅप्शन एलॉन यांनी फोटोला दिले.

यूट्यूबर Technoblade ला एलॉन यांनी वाहिली श्रद्धांजली

दुसऱ्या ट्वीटमध्ये एलॉन यांनी प्रसिद्ध यूट्यूबर Technoblade ला श्रद्धांजली वाहिली. Technoblade चे 1 जून वयाच्या 23 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. Technoblade चे मूळ नाव अ‍ॅलेक्स होते. त्याचे YouTube वर जवळपास 12 मिलियन फॉलोअर्स होते.

'व्हेनिस, महान स्मरणस्थळ', असं कॅप्शन देऊन एलॉन यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे.

'व्हेनिस, महान स्मरणस्थळ', असं कॅप्शन देऊन एलॉन यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे.

याआधी एलॉन हे जून 2020 मध्ये काही दिवस ट्विटरवर अ‍ॅक्टीव नव्हते. त्यावेळी मुलाच्या जन्मानंतर 'काही वेळेसाठी ट्विटर ऑफ करत आहे.', असं ट्वीट करुन एलॉन यांनी त्यांच्या ट्विटर ब्रेकबाबत माहिती दिली होती. त्यानंतर चार दिवसांनी एलॉन हे ट्विटरवर अ‍ॅक्टीव झाले होते. 2019 मध्ये देखील एलॉन यांनी तीन दिवस ट्विटर अकाऊंटवर कोणतेही ट्वीट शेअर केले नव्हते. यावेळी ट्विटरवरुन एवढे दिवस लांब राहण्याचे कारण मात्र एलॉन यांनी नेटकऱ्यांना सांगितलं नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT