Pakistan Food Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

उत्पन्न हजारात अन् बिल लखोंत! पाकिस्तानात विजेशिवाय येताहेत भरमसाठ बिले

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानातील आर्थिक आणि राजकीय संकट अधिक गडद होत चाललं आहे. महागाईने लोक त्रस्त आहेत. आता आणखी एका नव्या संकटाने लोकांना रस्त्यावर येण्यास भाग पाडले आहे.

पाकिस्तानमध्ये आधीच विजेचे दर खूप महाग आहेत, पण आता लोकांची बिले लाखांत येत आहेत. वीजबिलावरुन देशात गदारोळ सुरु झाला आहे. ज्यांच्याकडे घरभाडे भरण्यासाठी पैसे नाहीत, ते लाखो रुपयांचे वीजबिल कसे भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, वीजबिलाबाबत पाकिस्तानी नागरिकांची नाराजी वाढत आहे. अनेक भागात वीजपुरवठा नसताना ही स्थिती आहे. वीज बिलाच्या किमतीत कमालीची वाढ झाल्याने पाकिस्तानमधील (Pakistan) जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे लोक संतप्त झाले असून त्यांनी रस्त्यावर येऊन प्रशासकीय इमारतींसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

वीजबिलाबाबत मध्यंतरी सरकारने तातडीची बैठक घेतली असली तरी त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. 29 ऑगस्ट रोजी आणखी एक बैठक होऊ शकते, ज्यामध्ये वाढीव बिलांवर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानात महागाई का वाढत आहे?

खरे तर, गेल्या वर्षभरात पाकिस्तानात एका युनिट विजेचा दर 7 रुपयांवरुन 43 रुपयांवर गेला आहे. आयएमएफच्या दबावामुळे हे घडत आहे.

कारण आयएमएफने (IMF) या अटीवर बेलआउट पॅकेजचा दुसरा हप्ता दिला होता, ज्याची भरपाई करण्यासाठी पाकिस्तानात वीज, गॅस आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत.

यामुळेच शाहबाज सरकारनेही सातत्याने भाव वाढवले ​​आणि आता अन्वर उल हक यांच्या अंतरिम सरकारमध्ये भाव वाढवले ​​जात आहेत.

पाकिस्तानवर परकीय चलनाची गंगाजळी संपण्याचे संकट

पाकिस्तानात गरिबी, भूक, बेरोजगारी आणि महागाई गगनाला भिडली आहे. परकीय चलनाचा साठा संपुष्टात येण्याचे संकट आहे. यामागे पाकिस्तानचे कर्ज आहे, जे ते फेडण्यास सक्षम नाही. कर्जाचा बोजा जनतेवर दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानातील आर्थिक संकट अधिक गहिरं होत चाललं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival 2024: ‘सनबर्न’ इथेच का हवा आहे? दबावामुळे स्थानिक संतप्त; बैठकीसाठी सरसावल्या बाह्या

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

SCROLL FOR NEXT