Ecuador women declered dead Dainik Gomantak
ग्लोबल

Ecuador women: मृत घोषित करण्यात आलेली महिला, शवपेटी वाजवत म्हणाली "मी..."

मिळालेल्या माहितीनुसार या महिलेवर सध्या त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिथे तिला दोन दिवसांपूर्वी मृत घोषित करण्यात आले होते.

Ashutosh Masgaunde

इक्वाडोरमधील रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलेली 76 वर्षीय महिला जिवंत असल्याचे आढळून आले. यावेळी महिला शवपेटीवर ठोठावत म्हणाली, मी जिवंत आहे. मला बाहेर काढा.

“मी शवपेटी उचलली, आणि तिचे हृदय धडधडत होते, ती तिचा डावा हात शवपेटीवर आदळत होती… त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आम्ही 911 वर कॉल केला,” असे या महिलेचा मुलगा गिलबर्टो बारबेरा सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाला.

हे कुटुंब अत्यंत गरीब असल्याने त्यांना शवपेटीची व्यकडूवस्था करण्यासाठी लोकांकडून अर्थिक मदत घ्यावी लागली.

बाबाहोयोच्या किनारपट्टीवरील मार्टिन इकाझा सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी रुग्णालयाने शुक्रवारी महिलेला मृत घोषित केले.

"त्यांनी आम्हाला मृत्यूचे प्रमाणपत्र देखील दिले," असे महिलेच्या मुलाने स्थानिक माध्यमांना सांगितले.

स्त्रीचाा "पुनर्जन्म" अशा मथळ्यांसह, इक्वाडोरच्या माध्यमांमध्ये या असामान्य घटनेची मोठ्या प्रमाणावर नोंद घेण्यात आली आहे.

"माझी आई ऑक्सिजनवर आहे. तिचे हृदय स्थिर आहे. डॉक्टरांनी तिच्या हाताला चिमटा घेतला आणि तिने प्रतिक्रिया दिली," असे महिलेचा मुलगा बालबेरन, एल युनिव्हर्सो वृत्तपत्राच्या अहवालात म्हणाला.

इक्वाडोरच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, मोंटोयाला हृदय विकाराचा धक्का आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते " डॉक्टरांच्या उपचारांना कोणताही प्रतिसाद न देता महिलेची श्वसनक्रिया बंद पडली, त्यामुळे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. "असे इक्वाडोरच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे.

मंत्रालयाने सांगितले की त्यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे आणि ती मॉन्टोयाच्या तब्बेतीची देखरेख करेल.

बालबेरन यांनी सांगितले की त्यांनी रविवारी आपल्या आईला हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात भेट दिली होती. "काय घडले ते हळूहळू मला समजत आहे. आता मी फक्त माझ्या आईच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. मला ती जिवंत आणि माझ्या पाठीशी हवी आहे," तो म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT