Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी एकाचवेळी पाकिस्तानसह अनेक देश हादरले

India: गेल्या काही दिवसांपासून भारतासह जगातील अनेक देशांमध्ये भूकंपाच्या घटनांमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ashutosh Masgaunde

Earthquake shocks simultaneously shook many countries including Pakistan:

गेल्या काही दिवसांपासून भारतासह जगातील अनेक देशांमध्ये भूकंपाच्या घटनांमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटना कुठल्यातरी मोठ्या आपत्तीची चिन्हे आहेत, अशी भीती सर्वांना वाटत आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी पाकिस्तान, तिबेट आणि न्यू गिनीच्या किनारपट्टीवर भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपांची सविस्तर माहिती दिली आहे.

न्यू गिनी

मंगळवारी सकाळी न्यू गिनीच्या उत्तरेकडील किनारपट्टीजवळ जोरदार भूकंप झाला, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने अहवाल दिला आहे की, न्यू गिनीच्या उत्तरेकडील किनारपट्टीजवळ झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.5 एवढी होती. पहाटे 3.16 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्याचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून 10 किमी खोलीवर होता.

पाकिस्तान

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मंगळवारी पहाटे ३:३८ वाजता पाकिस्तानची जमीन भूकंपाने हादरली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी मोजण्यात आली आहे.

अहवालानुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून १० किलोमीटर खाली होता. याआधी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये १० किलोमीटर खोलीवर ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

जिझांग/तिबेट

मंगळवारी सकाळीच तिबेटमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, ज्याला चीन आता जिझांग म्हणतो.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, जिझांग भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 एवढी होती. हा भूकंप पहाटे 3:45 वाजता झाला आणि त्याचे केंद्र पृथ्वीपासून 140 किमी खोलीवर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT