Earthquake In Pacific Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake In Pacific: प्रशांत महासागरात जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 7.7 तीव्रता

प्रशांत महासागरात जाणवले भूकंपाचे धक्के जाणवले असुन अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Puja Bonkile

Earthquake In Pacific: प्रशांत महासागरात जाणवले भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 एवढी होती. भूकंपामुळे आसपासच्या बेट आणि महाद्वीपीय भागात सुनामीचा धोका वाढला आहे.

ज्यासाठी स्थानिक सरकारने देखील अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेतील न्यू कॅलेडोनिया, फिजी आणि वानुआतु या भागांसाठी हा इशारा देण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, हा भूकंप जमिनीच्या 10 किमी (6.21 मैल) खोलीवर झाल्याचे सांगण्यात आले आहे.

  • ग्वाटेमालामध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

या शक्तिशाली भूकंपाच्या काही तासांपूर्वी बुधवारी रात्री उशिरा मध्य अमेरिकेतील ग्वाटेमालामध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी होती. 

कॅनिला राजधानी ग्वाटेमाला शहराच्या उत्तरेस सुमारे 120 मैलांवर आहे. राजधानीतही भूकंपाचे धक्के जाणवले असले, तरी कोणतेही नुकसान झाल्याची माहिती नाही. ग्वाटेमालामध्ये झालेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

  • तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठे नुकसान

या वर्षाच्या सुरुवातीला 6 फेब्रुवारीला तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपाने मोठी हानी केली होती. तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला. दक्षिण तुर्कस्तानमधील गझियानटेप हे भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपातुन सावरत नाही तर लगेच दुसरा भूकंप झाला, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 तीव्रता होती. 

भूकंपाच्या धक्क्यांचा हा काळ इथेच थांबला नाही. यानंतर 6.5 रिश्टर स्केलचा आणखी एक धक्का बसला. तुर्कस्तानमध्ये एकामागून एक भूकंपामुळे 33 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT