Earthquake In Myanmar Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake In Myanmar: म्यानमारमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 4.2 तीव्रता

म्यानमारमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले असुन अद्याप कोणतीही हानी झाल्याची माहिती नाही.

दैनिक गोमन्तक

Earthquake In Myanmar: म्यानमारमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ४.२ एवढी होती.  अद्याप कोणतीही हानी झाल्याची माहिती नाही.

दरम्यान, पापुआ न्यू गिनीमध्ये आज म्हणजेच बुधवारी (3 मे) 5.6 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पापुआ न्यू गिनीच्या वायव्येस असलेल्या अंबुंतीमध्ये भूकंप झाला.

युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अंबुंतीपासून 16 किमी अंतरावर पश्चिम-वायव्येला होता. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 112 किमी होती, तरीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

  • भूकंप कसे होतात?

भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याच्या भूकंप लहरी तयार होतात. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन हालणे, जमिनीला भेगा, कंपन होणे तसेच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात.

भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात.

भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT