Women Dainik Gomantak
ग्लोबल

पतीसोबतचं इंस्टाग्राम चॅट सार्वजनिक करण पत्नीला पडलं महाग, कोर्टाने सुनावली शिक्षा

दुबईतील (Dubai) एका न्यायालयाने 40 वर्षीय महिलेला सुमारे 41 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दैनिक गोमन्तक

दुबईतील (Dubai) एका न्यायालयाने 40 वर्षीय महिलेला सुमारे 41 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पतीच्या गोपनीयतेशी छेडछाड केल्याप्रकरणी ही महिला दोषी आढळली आहे. खरं तर, महिलेने तिच्या पतीचा फोन नंबर आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते, त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. पोलीस तपासामधून समोर आले आहे की, महिलेने जानेवारी महिन्यात तिच्या पतीसोबतच्या शेवटच्या चॅटचे काही फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) अपलोड केले होते. त्यामुळे पीडित पतीने बुर, दुबई येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि तिच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

कोर्टात पतीने पत्नीच्या या कृत्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, पत्नीने कोर्टासमोर आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. तर दुसरीकडे पत्नीने आपल्या बचावात सांगितले की,मी त्याच्या फ्लॅटवर होते. दरम्यान त्याच्याच फोनवरुन त्याच्या बहिणीशी बोलत होते. दरम्यान, या महिलेचा तिच्या पतीचे घटस्फोटाचे प्रकरणही सुरु आहे.

तथापि, पत्नीने नंतर न्यायालयासमोर कबूल केले की, मी मुलांचे फोटो आणि पतीसोबतच्या चॅट्स इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या होते. पत्नीने पुढे सांगितले की, असे प्रकरण न्यायालयात पोहोचेल, हे माहित नव्हते. या प्रकरणाच्या तपासानंतर न्यायालयाने पत्नीला 41 हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले. तर दोषी पत्नीवर कठोर कारवाई करण्याची मागणी फिर्यादी पक्षाकडून करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT