Dubai 24 Carat Gold Road Dainik Gomantak
ग्लोबल

Dubai 24 Carat Gold Road: दुबईचा शाही थाट! चक्क 24 कॅरेट सोन्याचा रस्ता उभारणार; पर्यटकांसाठी ठरणार मोठं आकर्षण

Dubai 24 Carat Gold Road New Tourist Attraction: दुबई म्हटले की डोळ्यांसमोर उभ्या राहतात गगनचुंबी इमारती, आलिशान हॉटेल्स आणि जगाला थक्क करणारे आकर्षण.

Sameer Amunekar

Dubai 24 Carat Gold Road 2026 : दुबई म्हटले की डोळ्यांसमोर उभ्या राहतात गगनचुंबी इमारती, आलिशान हॉटेल्स आणि जगाला थक्क करणारे आकर्षण. आता याच दुबईत आणखी एका अनोख्या प्रकल्पाची तयारी सुरू आहे. येथे लवकरच २४ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात येणारा खास वॉकवे उभारण्यात येणार आहे. या मार्गावर पर्यटकांना प्रत्यक्ष चालण्याचा अनुभव घेता येणार आहे. या प्रकल्पाला 'गोल्ड स्ट्रीट' असे नाव देण्यात आले असून, जगातील पहिला आणि सर्वात लांब गोल्ड वॉकवे असल्याचा दावा केला जात आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत हा मार्ग पर्यटकांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

२४ कॅरेट सोन्यापासून तयार होणार खास रस्ता

दुबईच्या गोल्ड डिस्ट्रिक्ट परिसरात हा अनोखा गोल्ड वॉकवे उभारण्यात येणार आहे. सोने आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात पर्यटकांना आता सोन्याच्या मार्गावरून चालण्याचा वेगळाच अनुभव मिळू शकतो. या प्रकल्पामुळे दुबईच्या पर्यटन आकर्षणांमध्ये आणखी एका ठिकाणाची भर पडणार आहे.

गोल्ड डिस्ट्रिक्टच्या कमर्शियल सेक्टरचे वरिष्ठ संचालक राशिद अल हरमौदी यांच्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा उद्देश पर्यटकांना सोन्याशी संबंधित एक वेगळा अनुभव देणे हा आहे. या मार्गाची संपूर्ण रचना, बांधकामाची पद्धत आणि सोन्याचा वापर नेमका कसा केला जाणार, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, २०२६ च्या अखेरपर्यंत हा वॉकवे सुरू करण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे.

गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये आहेत १,००० हून अधिक दुकाने

दुबईचा गोल्ड डिस्ट्रिक्ट हा सोने आणि दागिन्यांच्या व्यापारासाठी महत्त्वाचा परिसर मानला जातो. जानेवारी २०२६ मध्ये या परिसराचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. येथे सोने, दागिने, परफ्यूम, सौंदर्यप्रसाधने आणि लाइफस्टाइलशी संबंधित १,००० हून अधिक दुकाने आहेत.

या भागात अनेक आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ज्वेलरी ब्रँड्सचे शोरूम आहेत. त्यामुळे खरेदीसाठी तसेच पर्यटनासाठीही या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता येथे गोल्ड स्ट्रीट तयार झाल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोन्याच्या व्यापारासाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबईला या प्रकल्पामुळे पर्यटनाच्या क्षेत्रातही वेगळी ओळख मिळू शकते.

दुबईतील सोन्याच्या झुमक्यांनीही रचला विश्वविक्रम

दुबईमध्ये सोन्याशी संबंधित आणखी एका विक्रमाची चर्चा सुरू आहे. जॉयअलुक्कास ज्वेलरीने येथे २२ कॅरेट सोन्याचे भव्य झुमके तयार केले आहेत. 'मयूरा सहस्र' असे या झुमक्यांचे नाव असून, त्यांचे एकूण वजन तब्बल १६.५१४ किलोग्रॅम आहे. या झुमक्यांची लांबी जवळपास चार फूट आहे.

या भव्य दागिन्यांनी जगातील सर्वात वजनदार आणि सर्वात मोठ्या सोन्याच्या कानातल्यांचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केल्याचा दावा करण्यात आला आहे. हे झुमके तयार करण्यासाठी कारागिरांनी अनेक महिने मेहनत घेतली. मोराच्या पिसांपासून प्रेरणा घेऊन त्यांची आकर्षक रचना करण्यात आली आहे. सध्या हे दागिने दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमधील 'ज्वेल ऑफ जॉय' शोरूममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.

पर्यटनाच्या नकाशावर दुबईला मिळणार नवी ओळख?

दुबईमध्ये दरवर्षी जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे सातत्याने वेगवेगळे प्रकल्प आणि अनोखी पर्यटनस्थळे विकसित केली जात आहेत. गोल्ड स्ट्रीट हा त्याच प्रयत्नांचा एक भाग मानला जात आहे.

हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास पर्यटकांना सोन्याच्या रस्त्यावरून चालण्याचा अनोखा अनुभव घेता येईल. त्यामुळे दुबईच्या 'गोल्ड सिटी' या ओळखीला आणखी एक आकर्षक पैलू जोडला जाऊ शकतो. आता हा प्रकल्प प्रत्यक्षात कसा दिसणार आणि पर्यटकांना त्याचा अनुभव कधी घेता येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कैद्यांना कोर्टाचा मोठा दिलासा; कोलवाळ कारागृह अधीक्षकांना शपथ देण्याचे अधिकार

US Classified Military Info Leak: पेंटागनमध्ये खळबळ! इराण-युक्रेन युद्धाचे 'टॉप सीक्रेट' लीक; अमेरिकन जनरलची 32 वर्षांची कारकीर्द धुळीस

Ranji Trophy Cricket: कमजोर फलंदाजीमुळे गोवा शरणागत, यंदा रणजी स्पर्धेत तिसरा पराभव; विदर्भ डाव व 27 धावांनी विजयी

Ind vs Pak: शशांक सिंहची वादळी खेळी व्यर्थ! महामुकाबल्यात पाकिस्तानने मारली बाजी; भारताचा 4 गडी राखून पराभव

Ironman Triathlon 2026: गोव्यात 'आयर्नमॅन'चा थरार! 30 देशांतील 2 हजारांहून अधिक ट्रायथलीट्स मैदानात

SCROLL FOR NEXT