Balcony Clothes Dainik Gomantak
ग्लोबल

बाल्कनीत कपडे सुकायला घालत असाल तर ही बातमी नक्की वाचा !

संयुक्त अरब अमिरातीची राजधानी असणाऱ्या अबुधाबीमध्ये (Abu Dhabi) अजब फर्मान जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

संयुक्त अरब अमिरातीची राजधानी असणाऱ्या अबुधाबीमध्ये अजबच फर्मान जारी करण्यात आला आहे. इथे बाल्कनीमध्ये कपडे वाळवण्याबाबत इशारा देण्यात आला आहे. चेतावणीनुसार, जर कोणी बाल्कनीमध्ये कपडे वाळवताना पकडला गेला तर त्याला 1000 दिरहम दंड ठोठावला जाईल. खरेतर, अधिकाऱ्यांनी रहिवाशांना अपार्टमेंटच्या बाल्कनीतून, खिडक्या किंवा रेलिंगमधून कपडे लटकवण्यास किंवा वाळवण्यास मनाई केली आहे. बाल्कनीत कपडे सुकायला टाकण्यात येत असल्यामुळे शहराचे सौंदर्य बिघडत चालले आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत अबुधाबीचे (Abu Dhabi) सौंदर्य टिकवण्यासाठी प्रत्येकाने या इशाऱ्यांचे पालन केले पाहिजे. (Drying clothes on a balcony in Abu Dhabi will result in a fine of Rs 20000)

अबुधाबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'सध्याचे नियम पाळले जातील याची खात्री करण्यासाठी संपूर्ण शहरात जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शहराचे सौंदर्य टिकून राहावे आणि कपडे धुण्याची घाणेरडी पद्धत बंद व्हावी, हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे अबुधाबी महापालिकेने (Municipal Corporation) म्हटले आहे. 'अपार्टमेंटच्या बाल्कनीत कपडे धुणे किंवा खिडकी किंवा रेलिंगला कपडे लटकवल्याने इमारतीचे सौंदर्य बिघडते, त्यामुळे आम्ही परवानगी देऊ शकत नाही, असे पालिकेच्या निवेदनात म्हटले आहे.

नियमांचे पालन न केल्यास सुमारे 21 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, 'अबुधाबीच्या लोकांनी शहराचे सौंदर्य टिकवून ठेवावे आणि त्यांच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीचा गैरवापर करु नये. असे असतानाही जर कोणी बाल्कनीचा गैरवापर करत असल्याचे आढळून आले तर त्याच्यावर 1000 दिरहम (सुमारे 21 हजार) पेक्षा जास्त दंड ठोठावला जाईल. कपडे धुण्यासाठी अत्याधुनिक लॉन्ड्री-ड्रायिंग तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. इलेक्ट्रॉनिक क्लोथ ड्रायर आणि कपडे सुकवणारे रॅक वापरा.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT