Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump यांची फेसबुक अन् युट्यूबवर दोन वर्षांनी वापसी

ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट काही कारणास्तव ब्लॉक करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Donald Trump Latest News: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर शुक्रवारी फेसबुक आणि यूट्यूबवर पुन्हा त्याचे कमबॅक झाले आहे. विशेष म्हणजे, 76 वर्षीय रिपब्लिकन नेता - जो पुन्हा राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आहे - दोन वर्षांपासून त्यांच्या 34 दशलक्ष फेसबुक फॉलोअर्स आणि 2.6 दशलक्ष युट्यूब सदस्यांसाठी कोणताही कटेंन्ट पोस्ट करू शकले नाहीत. अमेरिकेच्या कॅपिटल हिलवर झालेल्या हल्ल्यानंतर 6 जानेवारी 2021 रोजी माजी राष्ट्रपतींच्या सोशल मीडिया (Social Media) खात्यांवर बंदी घालण्यात आली होती.

ट्रम्प यांनी फेसबुक आणि यूट्यूबवर शेअर केला व्हिडिओ
ट्रम्पने 12 सेकंदाच्या व्हिडिओसह लिहिले, 'मी परत आलो आहे.' काही सेकंदांची ही क्लिप 2016 च्या निवडणुका जिंकल्यानंतरचे त्यांचे विजयी भाषण असल्याचे दिसते.

ट्रम्प यांनी व्हिडिओमध्ये (Video) 2024 च्या अध्यक्षपदासाठीची त्यांची निवडणूक प्रचार देखील जोडली आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये त्यांची प्रसिद्ध घोषणा 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' किंवा MAGA देखील जोडली, जी त्यांच्या शेवटच्या यशस्वी अध्यक्षीय मोहिमेदरम्यान लोकप्रिय झाली.

मेटाने जानेवारीमध्ये ट्रम्पच्या परतीची घोषणा केली होती

मेटाने 25 जानेवारी 2023 रोजी ट्रम्पची सोशल मीडिया अकाउंट पुनर्संचयित करणार असल्याची घोषणा केली होती.  मेटा ही कंपनी फेसबुक आणि इंस्टाग्रामचे संचालन करते. लोकांना राजकारण्यांचे ऐकण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे कंपनीने म्हटले आहे.

यासोबतच ट्रम्प यांनी यापुढे कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मेटाने दिला होता.

कॅपिटल हिंसाचारानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंटही ब्लॉक करण्यात आले होते. तथापि, ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क यांनी नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांचे खाते पुनर्संचयित केले. ट्विटरवर ट्रम्प यांचे 87 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. मात्र, बंदी उठवल्यापासून ट्रम्प यांनी अद्याप ट्विट केलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT