Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump: 2024 ची राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढविण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, पण...

अनेक प्रकरणात ट्रम्प यांची चौकशी सुरू असल्याने अपात्रतेची टांगती तलवार

गोमन्तक डिजिटल टीम

Donald Trump: अमेरिकेला पुन्हा महान बनविण्यासाठी मी राष्ट्राध्यक्ष पदासाठी स्वतःची उमेदवारी घोषित करत आहे, मी निवडणुकीसाठी तयार आहे, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यामुळे 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प हेच असतील, हे स्पष्ट झाले आहे.

कदाचित विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे देखील पुढील निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार असले तर पुन्हा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बायडेन विरूद्ध ट्रम्प असा सामना पाहायला मिळू शकतो. ट्रम्प यांनी यापुर्वीच US फेडरल इलेक्शन कमिटीत कागदपत्रे जमा केली होते.

ट्रम्प यांनी सिओक्स सिटी येथे एका रॅलीत पुढील निवडणूक लढविण्याबाबतचे संकेत दिले होते. देशाला अधिक सुरक्षित बनविण्यासाठी मी पुन्हा निवडणुकीत उभा राहू शकतो. तुम्ही सर्व तयारीत राहा. यापुर्वीही त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, मी निवडणूक लढवत असल्याने अनेकांना आनंद होईल. सर्वांनाच वाटते मी निवडणूक लढवावी. माझी पॉप्युलरिटी अधिक आहे. मी प्रेसिडेंट कँडिटेट साठी होणाऱ्या सर्व पोल आणि सव्हेर्तही आघाडीवर असेन.

ट्रम्प यांच्यासमोर अडचणी

ट्रम्प यांना मानणारा वर्ग असला तरी ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येतील की नाही, हे सांगणे कठिण आहे. कारण त्यांच्यावर दोन वेळा महाभियोग चालवला गेला होता. याशिवाय बिझनेसमध्ये फसवणूक, US कॅपिटल हिल बिल्डिंगवर हल्ला, 2020 च्या निवडणुकीचा निकाल मान्य न करणे, कागदपत्रे लपवणे, असे आरोप त्यांच्यावर आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. जर ते दोषी सिद्ध झाले तर ते अपात्र ठरतील. शिवाय पुढील निवडणुकीपर्यंत ट्रम्प यांचे वय 78 असणार आहे.

नुकत्याच मिड टर्म निवडणुकीत सिनेटमध्ये ज्यो बायडेन यांच्या पक्षाने वचर्स्व मिळवले आहे. तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये ट्रम्प यांचा पक्ष आघाडीवर असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT