Twitter Blue Tick Subscription संदर्भात मोठी बातमी, एलन मस्कची पुन्हा नवी घोषणा!

Twitter Subscription Launch: एलन मस्कने पुन्हा ट्विट करत नवी घोषणा केली आहे!
Twitter Blue Tick Subscription
Twitter Blue Tick SubscriptionDainik Gomantak
Published on
Updated on

एलन मस्कने ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन संदर्भात नवी घोषना केली आहे. अमेरिकेतील अनेक बनावट ट्विटर खात्यांनी पैसे भरून ब्लू टिक गेतले होते. यामुळे त्रासलेल्या ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती. पण, ते पुन्हा सुरू करण्यात येत आहे. एलन मस्क यांनी ट्विट करत म्हटले ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन 29 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू केले जाणार आहे. मस्क यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

ते पुढे म्हणाले, ब्लू व्हेरिफाईड 29 नोव्हेंबरपासून पुन्हा सरु होणार आहे." एलन मस्क यांनी लवकरच ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरू करण्याबाबत माहिती दिली आहे. अनेक बनावट ट्विटर अकाऊंट्सनी यापूर्वी पैसे भरून ब्लू टिक मिळवले होते आणि त्यानंतर या अकाऊंटवरून फेक ट्विट पोस्ट करण्यात आले होते. यामुळे ट्विटरने ब्लू टिक सेवा बंद करण्याचे आदेश दिले होते.

एलन मस्क यांनी याबाबत आधीच संकेत दिले होते. त्यानी एका युजर्सच्या ट्विटला प्रतिसाद दिला की ट्विटर ब्लू कदाचित "पुढच्या आठवड्याच्या शेवटी परत येईल", ब्लू टिक सबक्राइबर सेवा लवकरच पुन्हा सुरु होइल असा अंदाज व्यक्त केला होता आणि तसे झाले. 29 नोव्हेंबरपासून ते पूर्वीप्रमाणेच सुरू होणार असले तरी यावेळी अनेक गोष्टींची काळजी घेतली जाणार असून ब्लू टिक देण्यापूर्वी खबरदारी घेतली जाणार आहे.

  • मस्क यांनी ट्विटरवर अनेक बदल केलेत

एलन मस्कच्या हाती ट्विटरची धुरा आल्यानंतर त्यांनी अनेक बदल केले आहेत. त्यांनी सर्वप्रथम कंपनीच्या सीईओसह अनेक अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यानंतर ट्विटर सबस्क्रिप्शनवर आधारित ब्लू टिक बनवले. अशा सर्व बदलांमुळे ते सतत चर्चेत येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com