Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

डोनाल्ड ट्रम्प मार्च अखेरीस लॉन्च करणार स्वतःचे सोशल मीडिया नेटवर्क

ट्विटरकडून बंदी घालण्यात आलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) मार्चच्या अखेरीस स्वतःचे सोशल मीडिया नेटवर्क सुरु करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

ट्विटरकडून बंदी घालण्यात आलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मार्चच्या अखेरीस स्वतःचे सोशल मीडिया नेटवर्क सुरु करणार आहेत. फॉक्स बिझनेसने या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी याला ट्रुथ सोशल (Truth Social) असे नाव दिले आहे. अहवालानुसार, हे नेटवर्क चालू तिमाहीच्या अखेरीस पूर्णपणे कार्यान्वित होईल. (Donald Trump Will launch A Social Media Network By The End Of March)

Apple App Store मध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध

रिपोर्टनुसार, ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG) सध्या या अ‍ॅपची बीटा टेस्ट करत आहे. तसेच अमेरिकन लोक हे अ‍ॅप मार्च अखेर डाउनलोड करु शकतील. ट्रम्प यांचे नवीन नेटवर्क अद्याप सार्वजनिक नाही, परंतु Apple अ‍ॅप स्टोअरमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असल्याचे अहवालात म्हटले आहे. TRUTH सोशल रंबल सोबत सहयोग करणार आहे. एक प्लॅटफॉर्म जो स्वतःला YouTube आणि Amazon वेब सर्व्हिसेस (AWS) साठी पर्याय म्हणून स्थान देऊ शकतो. अ‍ॅपमध्ये व्हिडिओ-ऑन-डिमांड सेवा देखील समाविष्ट असेल, ज्यामध्ये नॉन-व्होकल मनोरंजन प्रोग्रामिंग देखील असेल.

ट्विटर आणि फेसबुकने ट्रम्पवर बंदी घातली

ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, ''आम्ही नेटवर्क बिग टेक सेन्सॉरशिपच्या विरोधात लढा देणार आहोत. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे संरक्षणही आम्ही करणार आहोत.'' विशेष म्हणजे, कॅपिटल बिल्डिंग (U.S. Parliament House) मध्ये त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसक निदर्शनेनंतर 6 जानेवारी रोजी ट्रम्प यांना ट्विटर आणि फेसबुकवर बंदी घालण्यात आली होती. ट्विटरने (Twitter) ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी बंदी घातल्यानंतर त्यांचे खातेही बंद केले होते. त्यानंतरच ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT