Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Strait Of Hormuz: होर्मुज सामुद्रधुनीवर कोणाचीच हुकूमशाही चालणार नाही! ट्रम्प यांची आता ओमानला धमकी; म्हणाले, 'पृथ्वीवरुन मिटवून टाकू' VIDEO

Donald Trump Threatens Oman: जागतिक राजकारणात आणि आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा कमालीचा तणाव निर्माण झाला.

Manish Jadhav

Donald Trump Threatens Oman: जागतिक राजकारणात आणि आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा कमालीचा तणाव निर्माण झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता ओमान या देशाला थेट आणि उघड धमकी दिली. होर्मुज सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनाबाबत इराण आणि ओमान यांच्यात काही गुप्त करार किंवा वाटाघाटी सुरु असल्याच्या अटकळा ऐकून ट्रम्प प्रचंड भडकले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ओमानला अत्यंत कडक शब्दांत सुनावले. ओमानने होर्मुज सामुद्रधुनीच्या प्रकरणापासून दूर राहिलेलेच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. होर्मुज हा जलमार्ग संपूर्ण जगासाठी खुला असून त्यावर कोणाचेही नियंत्रण खपवून घेतले जाणार नाही, असे सांगताना त्यांनी जर ओमानने इतर देशांप्रमाणे सामान्य वर्तन केले नाही, तर आम्ही त्यांना उद्ध्वस्त करु, अशी थेट युद्धाची भाषा केली.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले की, जर कोणत्याही आखाती देशाने होर्मुज सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनासाठी किंवा नियंत्रणासाठी इराणसोबत कोणताही करार केला, तर अमेरिका ते अजिबात खपवून घेणार नाही आणि संबंधित देशाला अमेरिकेच्या थेट लष्करी कारवाईला सामोरे जावे लागेल. होर्मुज हे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र असून अमेरिका या संपूर्ण सागरी मार्गावर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे यावर कोणीही हक्क सांगण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

इराणच्या संदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणला आता युद्ध संपवायचे असून ते अमेरिकेसोबत (America) करार करण्यास उत्सुक आहेत; परंतु त्यांच्या अटी अमेरिकेला मंजूर नाहीत. अमेरिकेच्या अटींनुसार करार झाला तरच तो मान्य केला जाईल, अन्यथा अमेरिका पुढील मोठ्या लष्करी कारवाईसाठी पूर्णपणे सज्ज आहे. आम्ही इराणकडून संपूर्ण युरेनियम काढून घेऊ, होर्मुजचा मार्ग कायमचा खुला करु आणि गरज पडल्यास इराणचे नाव पृथ्वीवरुन मिटवून टाकू, मात्र त्यांना कोणत्याही परिस्थितीत अणुबॉम्ब बनवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ट्रम्प यांनी घेतला.

या संपूर्ण वादाची ठिणगी इराणमध्ये अमेरिकेसोबत होणाऱ्या संभाव्य कराराचा एक रिपोर्ट लीक झाल्यामुळे पडली. या लीक झालेल्या रिपोर्टमध्ये इराण आणि ओमान यांच्यात होर्मुज सामुद्रधुनीचे संयुक्त व्यवस्थापन करणे, तिथल्या सागरी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आणि जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल करणे अशा धक्कादायक बाबींचा उल्लेख होता. ही माहिती समोर येताच ट्रम्प यांचा पारा चढला. त्यांनी हा लीक झालेला रिपोर्ट पूर्णपणे बनावट आणि कपोलकल्पित असल्याचे सांगत फेटाळून लावला.

तसेच, जागतिक बाजारपेठांनी इराणच्या (Iran) प्रसारमाध्यमांवर अजिबात विश्वास ठेवू नये, असा सल्ला दिला. अमेरिकेने ओमानला या संपूर्ण वादातून आणि इराणच्या मैत्रीतून तात्काळ बाहेर पडण्याचा अंतिम इशारा दिल्यामुळे आखाती देशांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT