Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

America Iran Tension: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला.

Manish Jadhav

America Iran Tension: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला असून यामुळे पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणवर आम्ही बारीक लक्ष ठेवून असून अमेरिकेचा एक अवाढव्य नौदल ताफा आखाती क्षेत्राच्या दिशेने कूच करत असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. 'फॉक्स न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक आटोपून एअर फोर्स वन विमानाने वॉशिंग्टनला परतत असताना ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी इराणला (Iran) धमकावताना म्हटले की, जर इराणने आपल्या देशातील आंदोलकांना फाशी देण्याचे सत्र थांबवले नाही, तर त्यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल. ट्रम्प यांच्या मते, इराणच्या अणु कार्यक्रमावर अमेरिकेने यापूर्वी केलेली कारवाई ही आगामी कारवाईच्या तुलनेत अतिशय नगण्य असेल.

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकेने आपल्या अनेक युद्धनौका आणि विमानांचा ताफा इराणच्या दिशेने वळवला आहे. "आमचा एक विशाल नौदल ताफा तिकडे जात आहे, कदाचित आम्हाला त्याचा वापर करावा लागणार नाही, पण परिस्थिती काय वळण घेते ते आपण पाहू," असे सूचक विधान ट्रम्प यांनी केले.

अल जजीरा'च्या वृत्तानुसार, दक्षिण चीन समुद्रात सरावासाठी तैनात असलेल्या 'यूएसएस अब्राहम लिंकन' या विमानवाहू युद्धनौकेला आणि तिच्या स्ट्राइक ग्रुपला तातडीने पश्चिम आशियाकडे वळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमेरिकेने जून 2025 मध्ये इराणच्या अणू केंद्रांवर हवाई हल्ले केले होते. जर इराणने आपला अणू कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका (America) गप्प बसणार नाही आणि पुन्हा एकदा लष्करी कारवाई करेल, असे संकेत ट्रम्प यांनी सीएनबीसीशी बोलताना दिले.

दुसरीकडे, इराणनेही अमेरिकेच्या या इशाऱ्याला जशास तसे उत्तर दिले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी 'वॉल स्ट्रीट जर्नल'मध्ये लिहिलेल्या लेखात अमेरिकेला कडक शब्दांत ताकीद दिली. अराघची यांच्या मते, जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तर तेहरान आपल्या संपूर्ण ताकदीनिशी चोख प्रत्युत्तर देईल आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगला जाणार नाही. हा संघर्ष केवळ मर्यादित नसून तो अत्यंत भीषण आणि दीर्घकाळ चालणारा असेल, असा इशाराही त्यांनी दिला. अराघची यांनी म्हटले की, इस्रायल आणि त्यांचे हस्तक व्हाईट हाऊसला संघर्षाची जी काल्पनिक कालमर्यादा सांगत आहेत, त्यापेक्षा हा लढा खूप मोठा असेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगातील सामान्य जनतेवर होईल.

सध्या इराणमध्ये अंतर्गत परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतरचे सर्वात मोठे सरकारविरोधी आंदोलन इराणमध्ये सुरु असून यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात मृतांचा आकडा 5000 च्या पार गेला असून 26 हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. एकीकडे देशांतर्गत असंतोष आणि दुसरीकडे अमेरिकेचा लष्करी दबाव अशा दुहेरी कात्रीत इराण अडकला आहे. ट्रम्प यांच्या या ताज्या इशाऱ्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली असून दोन्ही देशांमधील हा संघर्ष युद्धाच्या दिशेने तर जाणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Taxi Fire: पर्वरीत टुरिस्ट टॅक्सीनं घेतला पेट! पोलिस अन् स्थानिकांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Tridashanka Yoga 2026: 26 जानेवारीला आकाशात मोठा चमत्कार! बुध-अरुणचा 'त्रिदशांक योग' पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; सोमवार ठरणार भाग्याचा

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

प्रेमाचा सापळा आणि मृत्यूचा खेळ! एकाच कुटुंबातील चौघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा; इभ्रतीसाठी क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्यांना दणका

SCROLL FOR NEXT